श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी चेन्नई, तामीळनाडू येथील श्रीमती ललिता मुरलीधरन व कॅ. मुरलीधरन या साईभक्ताने साईचरणी ०३ लाख ०५ हजार ५३२ रुपये किंमतीचा ५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हिरे जडीत ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.