कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सपत्निक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.