श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप येथे साईभक्तांना मोफत निंब वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्हणाले, वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले असून वेळोवेळी वृक्षरोपणांचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तसेच वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी यापुर्वी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या हस्ते साईभक्तांना मोफत १ हजार निंब वृक्षांची रोपे वाटप करण्यात आलेली आहे.
त्याच अनुषंगाने मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप येथे संस्थानचे विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते साईभक्तांना मोफत १५०० निंब वृक्षांची रोपे वाटप करण्यात येणार असून या वृक्षवाटप कार्यक्रमास साईभक्त व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.मुगळीकर यांनी केले आहे.