Languages

   Download App

महाराष्‍ट्र अंध विद्यार्थी संघ, मुंबई यांच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील सुमारे १०० अंध विद्यार्थ्‍यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्‍यांचे स्‍वागत करुन त्‍यांचे कौतुक केले.

महाराष्‍ट्र अंध विद्यार्थी संघ, मुंबई यांच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील सुमारे १००

शिर्डी -

महाराष्‍ट्र अंध विद्यार्थी संघ, मुंबई यांच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील सुमारे १०० अंध विद्यार्थ्‍यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्‍यांचे स्‍वागत करुन त्‍यांचे कौतुक केले.

मुंबई येथील महाराष्‍ट्र अंध विद्यार्थी संघ यांच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील अंध विद्यार्थ्‍यांची दोन दिवसीय सहलीचे आयोजन करुन शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनाचे नियोजन केले. याबाबत महाराष्‍ट्र अंध विद्यार्थी संघाचे महासचिव यांनी संस्‍थान प्रशासनास कळविले होते. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या वतीने व्‍यवस्‍थापन समितीच्‍या निर्णयास अधिन राहुन सुमारे १०० अंध विद्यार्थ्यांची दर्शनाची, निवासाची व भोजन आणि अल्‍पोहाराची मोफत व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती. संस्‍थान प्रशासनाकडून करण्‍यात आलेल्‍या व्‍यवस्‍थेबाबत सहलीचे आयोजक व विद्यार्थ्‍यांनी समाधान व्‍यक्‍त करुन संस्‍थानचे आभार मानले.

संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी साईआश्रम भक्‍तनिवासस्‍थान येथे जावुन या अंध विद्यार्थ्‍यांचे स्‍वागत केले. तसेच अंध असूनही जीवना विषयी सकारत्‍मक दृष्‍टीकोण ठेवुन समाजामध्‍ये वावरण्‍याचे धाडस बघुन त्‍यांचे कौतुक करुन त्‍यांना पुढील वाटचालीसाठी श्रीमती बानायत यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

Undefined
महाराष्‍ट्र अंध विद्यार्थी संघ, मुंबई यांच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील सुमारे १०० अंध विद्यार्थ्‍यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्‍यांचे स्‍वागत करुन त्‍यांचे कौतुक केले.
Friday, December 3, 2021 - 17:30
Donation