Languages

   Download App

श्री रामनवमी उत्‍सवामध्‍ये  रुपये ०४ कोटी १६ लाख इतकी देणगी प्राप्‍त झाली

श्री रामनवमी उत्‍सवामध्‍ये  रुपये ०४ कोटी १६ लाख इतकी देणगी

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल ते दिनांक १५ एप्रिल २०१९ या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवामध्‍ये  रुपये ०४ कोटी १६ लाख इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.ठाकरे म्‍हणाले, दिनांक १२ एप्रिल ते १५ एप्रिल २०१९ याकालावधीत रोख स्‍वरुपात एकूण रुपये ०४ कोटी १६ लाख देणगी प्राप्‍त झाली असून यामध्‍ये दक्षिणापेटी मोजणी रुपये ०१ कोटी ९२ लाख ७६ हजार ५२७, देणगी काऊंटर ९८ लाख २० हजार ७७४ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये ०१ कोटी ११ लाख ५८ हजार ९७८ रुपये, सोने १९८.४०० ग्रॅम रक्‍कम रुपये ७.६१ लाख व चांदी ४१०२.६० ग्रॅम रक्‍कम रुपये १.११ लाख, १४ देशांचे परकिय चलन अंदाजे रुपये ४ लाख ९० हजार ८६० यांचा समावेश आहे.

श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या कालावधीत ०१ लाख ८० हजार ६७० साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला यामध्‍ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्‍क दर्शन/आरती पासेसव्‍दारे ६७ लाख ६१ हजार ४०० रुपये प्राप्‍त झालेले आहे. तसेच उत्‍सव कालावधीमध्‍ये श्री साईप्रसादालयामध्‍ये सुमारे ०१ लाख ९४ हजार ५२७ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ९५ हजार ४०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत ०२ लाख १६ हजार ८०० प्रसादरुपी लाडू पाकीटांची विक्री करण्‍यात आली. तसेच साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम भक्‍तनिवास व साईधर्मशाळा येथे ४५ हजार ८३३ साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपामध्‍ये सुमारे ०५ हजार साईभक्‍तांची निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. तसेच साईधर्मशाळा येथे ५६ पालख्‍यांची निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आली असल्‍याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे उपस्थित होते.

Undefined
श्री रामनवमी उत्‍सवामध्‍ये  रुपये ०४ कोटी १६ लाख इतकी देणगी प्राप्‍त झाली
Tuesday, April 16, 2019 (All day)