Languages

   Download App

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सव

श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सव

          श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही मंगळवार दिनांक ०४ ऑक्‍टोबर ते शुक्रवार दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२२ या कालावधीत श्री साईबाबांचा १०४ वा पुण्‍यतिथी उत्सव साजरा करण्‍यात येणार असून साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून ०५ ऑक्‍टोबर २०२२ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याचे सांगुन साईभक्‍तांनी या उत्‍सवात मोठ्या संख्‍येने सहभागी होवून उत्‍सवाची शोभा वाढवावी, असे आवाहनही संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले.
                    श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, श्री साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे श्री साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. त्‍यानुसार दिनांक ०४ ऑक्‍टोबर ते दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२२ या काळात १०४ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून उत्‍सवानिमित्‍त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.
                      श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी मंगळवार दिनांक ०४ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ०९.५० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
                 बुधवार, दिनांक ०५ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक ०५ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०६ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.
                   उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी गुरुवार, दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते ०९.१५ यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होईल. रात्रौ ९.१५ वाजता श्रींची पालखीची (गुरुवार नित्‍याची पालखी)  मिरवणूक होऊन रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.
          उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी शुक्रवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरती, सकाळी ०५.४५ वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्‍या दरम्‍यान श्रींची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.३० ते ०९.५० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार असल्‍याचे श्रीमती बानायत यांनी सांगितले.
                  हा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहेत.

Undefined
श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्सव
Monday, September 26, 2022 - 18:45
Donation Live Darshan