Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईनाथ रुग्‍णालयाचे तिस-या मजल्‍याचे काम पुर्ण झाले असून याठिकाणी उभारण्‍यात आलेल्‍या  अतिदक्षता कक्षाकरीता मुंबई येथील देणगीदार साईभक्‍त हरेश उत्‍तमचंदानी यांनी ०१ कोटी ४३ लाख ९८ हजार १६४ रुपया

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईनाथ रुग्‍णालयाचे तिस-या मजल्‍याचे

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईनाथ रुग्‍णालयाचे तिस-या मजल्‍याचे काम पुर्ण झाले असून याठिकाणी उभारण्‍यात आलेल्‍या  अतिदक्षता कक्षाकरीता मुंबई येथील देणगीदार साईभक्‍त हरेश उत्‍तमचंदानी यांनी ०१ कोटी ४३ लाख ९८ हजार १६४ रुपयांचे विविध साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले. या नविन अद्ययावत अतिदक्षता कक्षाचे हस्‍तांतर व शुभारंभ संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, देणगीदार साईभक्‍त डॉ.जयकिशन मोरदानी, भुषण शहा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पौरवाल, डॉ.कडू, डॉ.तांबे, परिचारक-परिचारीका व कर्मचारी उपस्थित होते.

श्री साईनाथ रुग्‍णालयात रुग्‍णांकरीता बेडची संख्‍या कमी पडत असल्‍यामुळे रुग्‍णालयाच्‍या इमारतीच्‍या तिस-या मजल्‍याचे बांधकाम हाती घेण्‍यात आलेले होते. तसेच सन २०१५ पासुन याठिकाणी जादा आय.सी.यु. कक्ष उभारण्‍याचे काम प्रस्‍तावित होते व त्‍यास मान्‍यताही प्राप्‍त झालेली होती. आता रुग्‍णालयाच्‍या इमारतीच्‍या तिस-या मजल्‍याचे काम पुर्ण झाले असून या रुग्‍णालयात एकुण ३०० बेड उपलब्ध होणार आहे. तसेच नविन अद्ययावत असे १० बेडचे अतिदक्षता कक्ष ही उभारण्‍यात आलेले आहे. या अतिदक्षता कक्षाकरीता मुंबई येथील देणगीदार साईभक्‍त हरेश उत्‍तमचंदानी यांनी ०१ कोटी ४३ लाख ९८ हजार १६४ रुपय किंमतीचे बेड, व्‍हेंटीलेटर, मॉनिटर असे विविध साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले. तसेच या ठिकाणी नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या वार्ड करीता पुणे येथील क्‍वॉलिसर्ज सर्जिकलच्‍या वतीने भुषण शहा यांनी ०५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे बेड, मॅटरेस, लॉकर आदी साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले.

यापुर्वी अतिदक्षता बेड कमी पडत असल्‍यामुळे ब-याच रुग्‍णांना दुस-या रुग्‍णालयात पाठविणे भाग पडत होते. आता या नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या  सुविधामुळे जास्‍तीत-जास्‍त रुग्‍णांना फायदा होणार आहे.

Undefined
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईनाथ रुग्‍णालयाचे तिस-या मजल्‍याचे काम पुर्ण झाले असून याठिकाणी उभारण्‍यात आलेल्‍या  अतिदक्षता कक्षाकरीता मुंबई येथील देणगीदार साईभक्‍त हरेश उत्‍तमचंदानी यांनी ०१ कोटी ४३ लाख ९८ हजार १६४ रुपया
Friday, March 12, 2021 - 10:15