Download App

नविन अत्‍याधुनिक 128 Slice सिटी स्‍कॅन मशिनचा शुभारंभ

नविन अत्‍याधुनिक 128 Slice सिटी स्‍कॅन मशिनचा शुभारंभ

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल मध्‍ये सुमारे ६.५३ कोटी रुपये किंमतीच्‍या नविन अत्‍याधुनिक 128 Slice सिटी स्‍कॅन मशिनचे उदघाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या शुभ हस्‍ते करण्‍यात आले.

याप्रसंगी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहे‍ब वाकचौरे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, सौ.नलिनी हावरे, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका सौ.मैथिली पितांबरे, डॉ.प्रितम वडगावे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री सुर्यभान गमे, दिलीप उगले व रेडीओलॉजीस्‍ट डॉ.व्‍यवहारे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये जुने असलेले ६४ स्‍लाईस सिटी स्‍कॅन मशिन बदलुन त्‍याजागी सुमारे ६ कोटी ५३ लाख २९ हजार ३९७ रुपये किंमतीचे अत्‍याधुनिक असे विप्रो जीई कंपनीचे १२८ स्‍लाईस सिटी स्‍कॅन मशिन बसविण्‍यात आलेले असून त्‍याचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. हे मशिन अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्वात अद्यावत असलेले एकमेव मशिन असून पुर्वीच्‍या मशिन पेक्षा जास्‍त वेगवान व नविन तंत्रज्ञान प्रणाली असलेले मशिन आहे. या मशिनव्‍दारे तपासणी ही जुन्‍या दरात केली जाणार असून या मशिनव्‍दारे हृदयाच्‍या कॉरोनरी अॅंजिओग्राफी तपासणीसाठी अधिक उपयोगी ठरणार आहे.

श्री साईबाबा व श्री साईनाथ या रुग्‍णालयाकरीता मागिल एका वर्षात १२७ मशिनरी खरेदीकरणेसाठी ३५ कोटी रुपयाचा पुरवठा आदेश देण्‍यात आलेला आहे. आजपर्यंत ९० विविध मशिनरी बसविण्‍यात आलेल्‍या आहेत. यामध्‍ये कॅथलॅब, सिटी स्‍कॅन, कलर डॉप्‍लर, डायलेसिश, एक्‍सरे, ओटी टेबल, म‍ल्‍टीपॅरा मॉनिटर आदि मशिनरींचा समावेश असून नवीन एम.आर.आय मशिन हे १५ डिसेंबर रोजी सुरु करण्‍यात येणार आहे. तर उर्वरित मशिन येत्‍या दोन महिन्‍यात कार्यान्‍वीत करण्‍यात येतील. गेल्‍या १५ वर्षात प्रथमच ऐवढया मोठया प्रमाणात अत्‍याधुनिक मशिनरी संस्‍थानच्‍या या दोन्‍ही हॉस्पिटलमध्‍ये बसविण्‍यात येत असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

Undefined
News Image: 
News Date: 
Friday, November 2, 2018