Download App

सुमारे २३.८१ कोटी रुपये खर्चाच्‍या कामाचा शुभारंभ

सुमारे २३.८१ कोटी रुपये खर्चाच्‍या कामाचा शुभारंभ

Undefined

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीमार्फत वाढीव शिर्डी संस्‍थान, कोपरगांव नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत संयुक्‍त पाणी पुरवठा योजना टप्‍पा क्र.१ च्‍या सुमारे २३.८१ कोटी रुपये खर्चाच्‍या कामाचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आला.

याप्रसंगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, पाणी पुरवठा विभाग प्रमुख राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीस सध्‍या पाणी पुरवठा मौजे-कनकुरी शिवारातील साठवण तलावातून करण्‍यात येत आहे. हे जल शुध्‍दीकरण केंद्र २५ वर्षा पूर्वीचे आहे. सध्‍याची पाण्‍याची मागणी पाहता या तलावाची क्षमता व जल शुध्‍दीकरण केंद्राची कार्यक्षमता अपूरी पडत आहे. त्‍याचप्रमाणे साठवण तलाव ते संस्‍थान परिसरात सर्व पाईपलाईन जीर्ण झाल्‍याने पाण्‍याची गळती होवून पाण्‍याचा अपव्‍यय होत आहे. तसेच जलकुंभाजी संख्‍या कमी असल्‍याने संस्‍थान परिसरातील सर्व ठिकाणी सारख्‍या दाबाने पाणी पुरवठा करता येत नाही. यासाठी वाढीव शिर्डी संस्‍थान, कोपरगांव नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत संयुक्‍त पाणी पुरवठा योजनेअंर्तगत टप्‍पा -०१ च्‍या कामास शासनाची मान्‍यता मिळाली असून याकरीता २३.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

त्‍यानुसार वाढीव शिर्डी संस्‍थान, कोपरगांव नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत संयुक्‍त पाणी पुरवठा योजनेच्‍या टप्‍पा क्र.०१ च्‍या अंर्तगत जल शुध्‍दीकरण केंद्र, जल शुध्‍दीकरण केंद्र ते संस्‍थान परिसरातील सर्व पाईप लाईन, पाण्‍याचे हौद व जल कुंभाची उभारणी करणेच्‍या कामाचा शुभारंभ आज संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला असून येत्‍या १८ महिन्‍यात काम पुर्ण करण्‍यात येणार आहे.

News Date: 
Tuesday, January 8, 2019