Download App

नवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेतील पदकाचे वितरण

नवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेतील पदकाचे वितरण

शिर्डी : अखिल भारतीय तलवारबाजी महासंघ,महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व अहमदनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आॅलंम्पीक संघटनेचे सचिव राजिव मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४ ते ६ आॅगस्ट दरम्यान शिर्डी येथील सिल्वर ओक लॉन्स येथे नवव्या राष्ट्रीय बालगट तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात आज दि.५ आँगस्ट रोजी झालेल्या सामन्याचा निकाल... फाँईल (मुली) साघिक तलवारबाजी प्रकारात मणिपुर,पंजाब,महाराष्ट्र,दिल्ली या राज्यांच्या संघाची तर फाँईल (मुले) साघिक तलवारबाजी प्रकारात मणिपुर,महाराष्ट्र,तेलंगाणा,पंजाब या राज्यांच्या संघाची सेमीफायनल मध्ये निवड झाली असून यांच्यातील अंतीम सामना उद्या रंगणार आहे.

वैयक्तिक फाँईल (मुली) तलवारबाजी प्रकारात जास्मिन कौर(पंजाब) हीस सुवर्ण पदक,एच.बाला(मनिपुर) हीस रजत तर ख्याती(पंजाब),एम.प्रिती(तामिळनाडू) यांनी कान्स्य पदके कमावली आहे.

वैयक्तिक सँबर (मुली) तलवारबाजी प्रकारात राधा(दिल्ली)हीस सुवर्ण पदक, खुशबू (हरियाणा) हीस रजत तर अक्षता (महाराष्ट्र),शशी बी.(तामिळनाडू) यांनी कान्स्य पदके कमावली आहे

पदक विजेत्यांना संत जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण,राज्य तलवारबाजी अध्यक्ष प्रकाश काटोळे,सचिव उदय डोंगरे,शेषनारायण रोडे,पांडुरंग रणमाळ,राहुल वाघमारे,प्रा.विशाल पवार तसेच राजेंद्र गोंदकर,अँड.जयंत जोशी,सचिन तांबे,विजय वहाडणे,सुनील कंगले,धरम बागरेचा आदि मान्यवरांच्या हस्ते पदकाचे वाटप करण्यात आले.सुत्रसंचलन स्वप्नील पाटील यांनी तर आभार शिवप्रसाद घोडके यांनी मानले.

यास्पर्धेचे पंच म्हणून भुषण जाधव,संजय भूमकर,शरद ठाकूर,रोषण ए.,भरत ठाकूर,स्वामी,स्वप्नील तांगडे,सागर मगरे,अजय त्रिभुवन हे पंच म्हणून काम पहात आहे.

स्पर्धेचा समारोप ६ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भारतीय आॅलंम्पीक संघटनेचे सचिव राजिव मेहता यांचे प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती भारतीय तलवारबाजी संघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे,राष्ट्रीय मीनी तलवारबाजी स्पर्धेचे आयोजक दिलीप घोडके यांनी दिली आहे.

Undefined
News Image: 
News Date: 
Sunday, August 5, 2018