Download App

साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षीत करण्‍याची सुविधेचा शुभारंभ

साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षीत करण्‍याची सुविधेचा शुभारंभ

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने रेल्‍वेने प्रवास करुन शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येणा-या साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षीत करण्‍याची सुविधा, इंटरनेटव्‍दारे संस्‍थानमार्फत उपलब्‍ध असलेल्‍या विविध सुविधा व मोबाईल अॅप्‍लीकेशनव्‍दारे देण्‍यात येणा-या विविध सुविधांचा शुभारंभ संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

यावेळी मे.टिसीएसचे उपाध्‍यक्ष श्री.व्‍ही.राजण्‍णा, IRCTC चे जनरल मॅनेजर श्री.टी.पद्ममोहन, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, अशोक औटी, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे, सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल म्‍हणाल्‍या, संस्‍थानच्‍या वतीने रेल्वेने प्रवास करणा-या साईभक्तांना ई-रेल्वे तिकीट आरक्षण करतेवेळेसच श्री साईंच्या दर्शनाचे पासेस आरक्षीत करण्याची सुविधा ई-रेल्‍वे तिकीट बुकींग (IRCTC च्‍या) वेबसाईटवरुन संस्थानचे ऑनलाईन सर्व्हिसेस (online.sai.org.in) या वेबसाईटद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे साईभक्तांच्या वेळेची बचत होऊन श्रींचे दर्शन सुलभतेने होवून शिर्डी वारी अधिक सुखकर होईल. सदरची सुविधा ही साईनगर-शिर्डी, कोपरगांव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षीत करणा-या साईभक्तांसाठी उपलब्‍ध असणार आहे. IRCTC च्‍यामार्फत सदरची सुविधा भाविकांना उपलब्‍ध करुन देणारे साईबाबा संस्‍थान हे देशातील प्रथम देवस्‍थान आहे. संस्‍थानचे वेबसाईटव्‍दारे आरती/दर्शन पास प्रमाणेच सत्‍यनारायण व अभिषेक पूजेचे तिकीटे आगाऊ आरक्षीत करता येणार आहे. तसेच मोबाईल अँप्सच्‍या सहाय्याने साईभक्‍तांना त्‍यांचे मोबाईलव्‍दारे संस्‍थानमार्फत उपलब्‍ध सत्‍यनारायण व अभिषेक पूजा कुपन, दर्शन/आरती पासेस, आगाऊ रुम बुकींग, देणगी व प्रकाशने आदी सुविधांचा लाभ घेता येईल.

योवळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे, IRCTC चे जनरल मॅनेजर श्री.पद्ममोहन आदींची भाषणे झाली. र्या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व आभार उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील यांनी मानले.

Undefined
News Image: 
News Date: 
Saturday, January 26, 2019