Download App

माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी यांचे संमेलन

माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी यांचे संमेलन

Undefined

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने दिनांक १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायं. ७ ते ८ यावेळेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे संस्‍थानचे माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, मुख्‍य लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक व कर्मचारी यांचे संमेलन आयोजित करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांनी दिली.

श्रीमती रुबल अग्रवाल म्‍हणाल्‍या, श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पुर्ण होत असून श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने समाधीचा शताब्‍दी सोहळा दिनांक ०१ ऑक्‍टोबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येत आहे. हा समाधी शताब्‍दी सोहळा भव्‍य स्‍वरुपात साजरा व्‍हावा याउद्देशाने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येत आहे. या शताब्‍दी वर्षाची सांगता येत्‍या श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात दिनांक १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी होत आहे. हा श्री साईबाबा समाधी शताब्‍दी सोहळा अविस्‍मरणीय व्‍हावा या याउद्देशाने संस्‍थानचे विद्यमान अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व व्‍यवस्‍थापन समितीने यापुर्वीचे व्‍यवस्‍थापन समितीचे माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, मुख्‍य लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक व कर्मचारी यांचे संमेलन आयोजित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार दिनांक १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायं. ०७.०० ते रात्रौ ०८.०० यावेळेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे या संमेलनाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

तरी संस्‍थानचे सर्व माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष, विश्‍वस्‍त, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, मुख्‍य लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक व कर्मचारी यांनी या संमेलनास उपस्थित रहावे असे आवाहन ही श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.

News Date: 
Thursday, October 11, 2018