Download App

साई समाधी शताब्दी निमित्त वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धा

साई समाधी शताब्दी निमित्त वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धा

Undefined

श्री साई समाधी शताब्‍दी महोत्सवा निमित्‍त शुक्रवार दि. १२ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्‍य स्‍तरीय मराठी निबंध व वक्तृत्व स्‍पर्धा, जिल्‍हास्‍तरीय शालेय चित्रकला स्‍पर्धा व शालेय इंग्रजी वक्तृत्व स्‍पर्धा आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या स्पर्धकांना एक लाख ६८ हजारांची रोख बक्षीसे,साईप्रतिमा आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली आहे. स्पर्धेचे माहितीपत्रक संस्थानचे वेबसाईटवर देण्यात आले आहे.

श्री साईबाबा शताब्‍दी पुण्‍यातिथी महोत्‍सवाचे औचित्‍य साधून शालेय विद्यार्थी करीता चित्रकला स्‍पर्धा, इंग्रजी वक्तृत्व स्‍पर्धा तसेच शालेय व खुल्या गटाकरीता मराठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन शिर्डी येथे साईबाबा संस्‍थान शैक्षणिक संकुलात आणि साईबाबा महाविद्यालयात करण्‍यात आले आहे. शालेय विद्यार्थ्‍याचा सर्वागीण विकास होणेकरिता व साईबाबाच्‍या जीवनचरित्राविषयी माहीती मिळावी व या माहितीचा प्रचार प्रसार व्‍हावा व त्‍यांच्‍या अंगी असलेल्‍या कलागुणांना एक हक्‍काच व्‍यासपीठ मिळावं व त्‍या अनुषंगाने शताब्‍दी वर्षात या बाळ गोपाळांचा मेळावा साई संस्‍थान संकुलात भरविण्यात आला आहे.

मराठी वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी खुला गट, वरिष्‍ठ महाविद्यालय व कनिष्‍ठ महाविद्यालय गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक ५००० रुपये , द्वितीय क्रमांक ३०००रुपये ,तृतीय क्रमांक २००० रुपये तसेच दोन उत्‍तेजनार्थ स्पर्धकांना १००० रुपये रोख बक्षीस ,प्रशिस्‍तपत्र व साई प्रतिमा असे स्‍वरुप राहील तसेच सर्व सहभागी स्‍पर्धकांसाठी प्रशस्‍तीपत्र पत्र देण्यात येईल. या गटातील वक्तृत्व स्पर्धकांना ७ मिनिटे वेळ देण्यात येईल. मराठी वक्तृत्व व निबंध आणि इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी माध्यमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळा गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक ३०००रुपये , द्वितीय क्रमांक २०००रुपये ,तृतीय क्रमांक १५०० रुपये तसेच दोन उत्‍तेजनार्थ स्पर्धकांना १००० रुपये रोख बक्षीस,प्रशिस्‍तपत्र व साई प्रतिमा असे स्‍वरुप राहील तसेच सर्व सहभागी स्‍पर्धकांसाठी प्रशस्‍तीपत्र पत्र देण्यात येईल. या गटातील वक्तृत्व स्पर्धकांना ५ मिनिटे वेळ देण्यात येईल. निबंध लेखनासाठी १ तास ३० मिनिटे वेळ देण्यात येईल

चित्रकला स्पर्धेसाठी वेळ सर्व गटांसाठी ०२ तास असून गट अ (१ली ते ४ थी),ब गट (५ वी ते ७ वी), क गट (८ वी ते १० वी) आणि ड गट (११ वी-१२ वी) असे गट करण्यात आले असून अ,ब आणि क गटातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे प्रथम क्रमांक ३०००रुपये,द्वितीय क्रमांक २०००रुपये,तृतीय क्रमांक १५०० रुपये तसेच दोन उत्‍तेजनार्थ स्पर्धकांना १००० रुपये रोख बक्षीस,प्रशिस्‍तपत्र व साई प्रतिमा असे स्‍वरुप राहील तसेच सर्व सहभागी स्‍पर्धकांसाठी प्रशस्‍तीपत्र पत्र देण्यात येईल. ड गटातील विजेत्या स्पर्धकांना स्पर्धकांना प्रथम क्रमांक ५००० रुपये , द्वितीय क्रमांक ३०००रुपये ,तृतीय क्रमांक २००० रुपये तसेच दोन उत्‍तेजनार्थ स्पर्धकांना १००० रुपये रोख बक्षीस ,प्रशिस्‍तपत्र व साई प्रतिमा असे स्‍वरुप राहील तसेच सर्व सहभागी स्‍पर्धकांसाठी प्रशस्‍तीपत्र पत्र देण्यात येईल.

या सर्व स्‍पर्धेत राज्‍यातील सर्व माध्‍यमांच्‍या शाळांना सहभागी करुन घेण्यात येईल बाबांच्‍या जीवनपटाचा प्रचार व प्रसार होणेसाठी व शालेय विद्यार्थ्‍यांना बाबांचे जीवन व त्‍यांचे कार्य समजण्‍यासाठी ही स्‍पर्धा घेण्यात येत आहे. स्‍पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठल्‍याही प्रकारचे शुल्‍क आकारले जाणार नाही. स्‍पर्धेत विद्यार्थ्‍यांसह उपस्थित शिक्षक-पालक यांची चहापान व भोजनव्‍यवस्‍था करण्यात येईल. सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण शताब्‍दी समारोह कार्यक्रमात करण्‍यात येईल, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांनी दिली.

News Date: 
Monday, October 8, 2018