शिर्डी-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दि.१३ सप्टेंबर, दि.२० सप्टेंबर व दि.२२ सप्टेंबर २०१८ रोजी सायं.०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत विविध सांस्कृतिक व धार्मिक कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी व साईभक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांनी केले आहे.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, श्री साईबाबांच्या समाधीस १८ ऑक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पुर्ण होत असून श्री साईबाबा संस्थानच्या वतीने समाधीचा शताब्दी सोहळा दिनांक ०१ ऑक्टोंबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने वर्षभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने दिनांक १३ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत श्री.किशोर सासवडे, शिर्डी यांचा साई पोवाडा कार्यक्रम व दिनांक २२ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत श्री.अतुल राखे, बडोदा यांचा साईभजन कार्यक्रमाचे होणार आहे. हे कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहे.
तसेच दिनांक २० सप्टेंबर २०१८ ते दिनांक २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सायं. ०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत इंटरनॅशनल साई फाऊंडेशन, नोएडा यांचा श्री साई दिव्य कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम श्री साईआश्रम समाधी शताब्दी मंडपातील (साईआश्रम भक्तनिवास) स्टेजवर होणार आहे.