Languages

   Download App

साईसेवा A Divine Blessing या पुस्‍तकाचे प्रकाशन

साईसेवा A Divine Blessing या पुस्‍तकाचे प्रकाशन

Undefined

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी लिहीलेल्‍या दिनांक ११ ऑगस्‍ट २०१९ रोजी रात्रौ ०७.३० वाजता श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप येथे राज्‍याचे महसुल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील व गृह निर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

री.मुगळीकर म्‍हणाले, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी संस्‍थानच्‍या अध्‍यक्ष पदाची धुरा हाती घेतल्‍यानंतर साईभक्‍तांना केंद्रस्‍थानी ठेवुन साईभक्‍तांकरीता विविध उपक्रम राबविले असून या विविध उपक्रमांची माहिती या पुस्‍तकात देण्‍यात आलेली आहे. तसेच दिनांक ०१ ऑक्‍टोबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सव संस्‍थानच्‍या वतीने मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या शताब्‍दी वर्षात विविध धार्मिक, सांस्‍कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले होते. तसेच मा.राष्‍ट्रपती श्री.रामनाथ कोविंद, मा.उप‍राष्‍ट्रपती श्री व्‍यंकय्या नायडु, मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आदि मान्‍यवरांनी शताब्‍दी वर्षात साईंच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या मान्‍यवरांच्‍या शिर्डी भेटीची माहिती छायाचित्रांसह या पुस्‍तकात देण्‍यात आलेली आहे.

अशा या “साईसेवा A Divine Blessing” या पुस्‍तकाचे प्रकाशन रविवार, दिनांक ११ ऑगस्‍ट २०१९ रोजी रात्रौ ०७.३० वाजता हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप येथे आयोजित करण्‍यात आलेला आहे असे सांगुन जास्‍तीत-जास्‍त साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले.

Friday, August 9, 2019 (All day)