Download App

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्‍पर्धेकरीता श्री साईबाबा महाविद्यालयाच्‍या खेळाडूंची निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्‍पर्धेकरीता श्री साईबाबा महाविद्यालयाच्‍या खेळाडूंची

Undefined

शिर्डी -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत दिनांक ०७ व ०८ ऑक्‍टोबर रोजी आंतर महाविद्यालयीन मैदानी स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले होते.सदरच्‍या स्‍पर्धा संगमनेर महाविद्यालयात पार पडल्‍या. या स्‍पर्धांमध्‍ये अहमदनगर जिल्‍हयातील विविध महाविद्यालयाच्‍या एकूण ५०० स्‍पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्‍यात श्री साईबाबा संस्‍थानने नव्‍याने सुरु केलेल्‍या साईबाबा महाविद्यालयातील विद्यार्थीनी गायत्री ठाकरे ,वैष्‍णवी दाभाडे,पुनम कांबळे आणि पुजा सुरासे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.

यामध्‍ये गायत्री ठाकरे हीने १०० मीटर अडथळा शर्यत मध्‍ये प्रथम, वैष्‍णवी दाभाडे हीने पाच कि.मी.चालणे मध्‍ये प्रथम,पुनम कांबळे हीने थाळीफेक मध्‍ये द्वितीय तर पुजा सुरासे हीने पाच कि.मी.चालणेमध्‍ये तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थीनींनी केलेली नेत्रदिपक व उल्‍लेखनीय कामगिरीबददल त्‍यांची ११ व १२ ऑक्‍टोबर रोजी नासिक येथे आयोजित केलेल्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्‍पर्धेकरीता निवड झाली आहे.

या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र कोहोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.तर खेळाडूंनी मिळविलेल्‍या घवघवीत यशाबददल संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे,उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम,सर्व विश्‍वस्‍त मंडळ सदस्‍य,मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल,उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम,मनोज घोडे पाटील,उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे,सर्व प्रशासकीय अधिकारी,प्राचार्य विकास शिवगजे आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

News Date: 
Tuesday, October 9, 2018