Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १०

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

        डॉ.हावरे म्‍हणाले, राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विशेषताः पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापुर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गांवेही उध्‍वस्‍त  झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजुन या पुरग्रस्‍तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने घेण्‍यात आलेला आहे. सदरचा निधी न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असुन संस्‍थानच्‍या वतीने परिस्‍थीती बघुन वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविणार आहे.

राज्‍य शासन पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्‍यात आलेली ही आपत्‍ती मोठी असून या आपत्‍तीतुन बाहेर पडण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या चरणी प्रार्थना करीत असल्‍याचे डॉ.हावरे यांनी सांगितले.

 
Undefined
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी
Saturday, August 10, 2019 (All day)