Download App

संस्‍थानच्‍या कंत्राटी कर्मचा-यांना महिन्‍याला चार पगारी सुट्या देण्‍याचा निर्णय

संस्‍थानच्‍या कंत्राटी कर्मचा-यांना महिन्‍याला चार पगारी सुट्या देण्‍याचा निर्णय

Undefined

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या कंत्राटी कर्मचा-यांना महिन्‍याला चार पगारी सुट्या देण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकीत घेण्‍यात आला असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

नुकतीच संपन्‍न झालेल्‍या संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकीस संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त सर्वश्री बिपीनदादा कोल्‍हे, अॅड.मोहन जयकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्‍हाधिकारी मनोज घोडे पाटील व उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदी उपस्थित होते.

डॉ.हावरे म्‍हणाले, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता लाखो भाविक शिर्डीत येतात. येणा-या यासाईभक्‍तांना संस्‍थानच्‍या वतीने अनेक सोयी-सुविधा पुरविल्‍या जातात. याकरिता विविध विभागांची निर्मिती करण्‍यात आलेली आहे. या विभागांमध्‍ये संस्‍थान आस्‍थापनेवरील कायम कर्मचा-याबरोबरच ठेकेदारामार्फत सुमारे २६५० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. शासनाच्‍या कंत्राटी कामगार सुट्यांच्‍या कायद्याच्‍या तरतुदीचा व कामगारांच्‍या भावनांचा विचार करुन महिन्‍याला चार पगारी सुट्या देण्‍यास संस्‍थान व्‍यवस्‍थापन समितीने मान्‍यता दिलेली आहे. यामुळे संस्‍थानवर वार्षीक सुमारे ५ कोटी रुपये अतिरिक्‍त भार वाढणार असल्‍याचे ही डॉ.हावरे यांनी सांगितले.

News Date: 
Saturday, November 24, 2018