Download App

क्ष किरण तज्ञांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

क्ष किरण तज्ञांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

कोपरगांव :-

आज वैद्यकिय क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत रूग्णांच्या वेदना त्यांना जास्त त्रास न होता कशा बऱ्या होतील यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमांतुन भर दिला जात आहे. सुलभ क्ष किरण उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वैद्यकिय क्षेत्रातील मंडळींनी करावा असे आवाहन साईबाबा संस्थानचे विश्वस्थ व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय देवस्थान साईबाबा शिर्डी येथे रेडीओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतींने राष्ट्रीय क्ष किरण तज्ञांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती त्याचे उदघाटन श्री. कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध कंपन्यांचे ट्रेड स्टॉलचे उदघाटन हभप उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाभा ऍ़टोमिक रिसर्च सेंटरचे डॉ अविनाश सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत चेन्नई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद, कलकत्ता, मुंबई आदि नामांकित रूग्णालयातील तज्ञ वैद्यकिय अधिकाऱ्यांनी व्याख्याने दिली. देशभरातील पाचशे क्ष किरण तज्ञ व तंत्रज्ञ या परिषदेत उपस्थित होते. त्यांना विजय कोते यांच्या हस्ते विविध भाषेतील साईचरित्र ग्रंथाची भेट देण्यांत आली. डॉ अविनाश सोनवणे यांनी रेडीयेशनचा वैद्यकिय क्षेत्रात निदान आणि उपचारासाठी कसा उपयोग होतो याची माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी साईबाबा संस्थान रूग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ विजय नरोडे, वैद्यकिय अधिक्षीका डॉ मैथीली पितांबरे, वैद्यकिय प्रशासक डॉ प्रितम वडगावे, डॉ सचदेव डॉ कवडे, डॉ भगवान शिंदे, डॉ डी डी शेटटी, श्री त्रिलोकीनाथ मिश्रा, श्री विलास भदाणे आदि उपस्थित होते. प्रारंभी डॉ उमेश व्यवहारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले सचिव वसंत लबडे यांनी परिषदेची प्रस्तावना सांगितली. डॉ केसरकर यांनी आभार मानले.

Undefined
News Image: 
News Date: 
Wednesday, September 5, 2018