Download App

एक दिवसीय अखंड श्रीसाईसच्‍चरित पारायण शुभारंभ

एक दिवसीय अखंड श्रीसाईसच्‍चरित पारायण शुभारंभ

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी महोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने आज आयोजित करण्‍यात आलेल्‍या एक दिवसीय अखंड श्रीसाईसच्‍चरित पारायणास आज संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते श्रींच्‍या प्रतिमेची, पोथीची व कलश पुजन करुन सुरुवात करण्‍यात आली.

एक दिवसीय अखंड श्रीसाईसच्‍चरित पारायणानिमित्‍त श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची, प्रतिमा, विणा व कलशाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी पोथी, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके यांनी कलश व उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी सौ.प्रिया कदम, सौ.सरस्‍वती वाकचौरे, सौ.मनाली निकम, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

मिरवणूकीनंतर संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते श्रींच्‍या प्रतिमेची, पोथीची व कलश पुजन करुन स्‍तवनमंजरीचे वाचन करण्‍यात येवून पारायणास सुरुवात झाली. दिवसभर महिला वाचकांना पारायण वाचनाची संधी देण्‍यात आली. सकाळी ७ ते ११ अशी प्रत्‍येक ४ तासांच्‍या बॅचेस तयार करण्‍यात आलेल्‍या आहे. उद्या दिनांक १२ ऑक्‍टोबर २०१८ रोजी या अखंड पारायणाची समाप्‍ती होणार आहे.

पारायण समाप्‍तीनंतर शिर्डी गावातून भव्‍य शोभायात्रा काढण्‍यात येणार आहे. या शोभायात्रेसाठी विविध राज्‍यातील कलाकार सहभागी होणार असून या शोभायात्रेत संबळ, सनई व डफ वादन, शिंग-तुतारी-चौघाडा, पारंपारिक नृत्‍य, झांज पथक, ढोल पथक, विविध जिवंत देखावे, पारंपारिक वेषभुषेसह नृत्‍य, दक्षिणात्‍य वाद्य, श्रींची वेषभूषा व देखावे आदींचा समावेश असणार आहे.

Undefined
News Image: 
News Date: 
Thursday, October 11, 2018