Download App

News

News

नविन 3 Tesla MRI मशिनचे उदघाटन

January 1st, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल मध्‍ये सुमारे १५ कोटी ६० लाख ५१ हजार ५९७ रुपये किंमतीच्‍या नविन 3 Tesla MRI मशिनचे उदघाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या शुभ हस्‍ते करण्‍यात आले.

याप्रसंगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहे‍ब वाकचौरे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, सौ.नलिनी हावरे, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय प्रशासक डॉ.प्रितम वडगावे, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, रेडीओलॉजीस्‍ट डॉ.व्‍यवहारे व डॉ.नागरे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये जुने असलेले 1.5 Tesla MRI मशिन बदलुन त्‍याजागी सुमारे १५ कोटी ६० लाख ५१ हजार ५९७ रुपये किंमतीचे अत्‍याधुनिक असे 3 Tesla MRI मशिन बसविण्‍यात आलेले असून त्‍याचा शुभारंभ संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. हे मशिन अहमदनगर व नासिक जिल्‍ह्यातील सर्वात अद्यावत असलेले एकमेव मशिन असून पुर्वीच्‍या मशिन पेक्षा जास्‍त वेगवान व नविन तंत्रज्ञान प्रणाली असलेले मशिन आहे. या मशिनव्‍दारे तपासणी ही जुन्‍या दरात केली जाणार असून या मशिनव्‍दारे मेंदु, मणके, स्‍तन प्रोस्‍टेट व यकृत या अवयवांच्‍या संबंधीत रोग निदानासाठी उपयोगी ठरणार आहे. तसेच या नवीन मशिनमुळे मानवाच्‍या सर्वच अवयवांचे अचुक स्‍कॅनिंग करता येणे शक्‍य होणार आहे.

श्री साईबाबा व श्री साईनाथ या रुग्‍णालयाकरीता मागिल एका वर्षात १०० विविध प्रकारच्‍या मशिनरी बसविण्‍यात येवून कार्यान्‍वीत करण्‍यात आलेल्‍या आहे. यामध्‍ये कॅथलॅब, सिटी स्‍कॅन, एम.आर.आय मशिन, कलर डॉप्‍लर, डायलेसिश, ओटी टेबल, म‍ल्‍टीपॅरा मॉनिटर आदि मशिनरींचा समावेश आहे. तर एक्‍सरे, मॉरचुरी कॅबिनेट, व्हिडीओ गॅस्‍ट्रोस्‍कोप व अत्‍याधुनिक शस्‍त्रक्रिया करणेसाठीचे टेबल असे एकुण १० नवीन मशिन येत्‍या दोन महिन्‍यात कार्यान्‍वीत करण्‍यात येतील.

Recent News