Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थान शताब्‍दी महोत्‍सवी वर्ष आणि सेवा उपक्रम

October 24th, 2018

शिर्डी-

मुंबई दुरदर्शन सहृयाद्री वाहिनीवर दिनांक २६ ऑक्‍टोबर २०१८ रोजी सायं. ०५.०० ते ०६.०० या वेळेत थेट प्रसारीत होणा-या महाचर्चा कार्यक्रमात ‘श्री साईबाबा संस्‍थान शताब्‍दी महोत्‍सवी वर्ष आणि सेवा उपक्रम’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती मुंबई दुरदर्शनचे सहाय्यक संचालक जयु भटकर यांनी दिली.

श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सवाचा समारोप व संस्‍थानच्‍या विविध विकास प्रकल्‍पांचा भुमिपूजन समारंभ शिर्डी येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत नुकताच पार पडला. शताब्‍दी वर्षभरात साईसंस्‍थानने राबवलेल्‍या विविध कल्‍याणकारी व सेवाभावी कार्यक्रमांचे सिंहावलोकन करण्‍याच्‍या या कार्यक्रमात साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, लोकमत जळगांव आवृतीचे निवासी संपादक मिलींद कुलकर्णी आणि डॉ. सुरेश नगरशेखर यांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण शनिवार दि. २७ ऑक्‍टोबर २०१८ रोजी रात्रौ. १०.०० वा. करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय भुसकटे हे करणार असल्‍याचे श्री. भटकर यांनी सांगितले.

Recent News