Languages

   Download App

Sai Leela - 1979

Sai Leela - 1979

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक १५ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली.

आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर व सायंकाळी विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तर मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायं.०७.०० वाजता धुपारती झाली तसेच रात्रौ ०७.३० वाजता पं.राजा काळे, पुणे यांचा अभंग कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर झाला. यासर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Undefined
News Image: 
News Date: 
Wednesday, July 17, 2019