Download App

श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ सांगता दिवस

श्री गुरुपौर्णिमा उत्सव - २०१८ सांगता दिवस

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २६ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.श्री.चारुदत्‍त गोविंदस्‍वामी, आफळे, पुणे यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली.

आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व प्रखर अग्रवाल यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तर उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मनाली निकम यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. सकाळी १०.३० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायं. ०७.०० वाजता धुपारती झाली. तसेच रात्रौ ०७.३० ते ०९.०० यावेळेत श्री.सुधांशु लोकेगांवकर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम, रात्रौ ०९.०० ते ०९.४५ यावेळेत श्री.अंचल शर्मा, रायपूर यांचा साई भजन कार्यक्रम व रात्रौ ०९.४५ ते ११.०० यावेळेत श्री.मदन चौहान, रायपूर यांचा साई भजन कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर झाला. यासर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Undefined
News Image: 
News Date: 
Saturday, July 28, 2018