Languages

   Download App

Welcome to Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi

Welcome to Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्रदिनानिमित्‍त संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले.

यावेळी संस्थानचे प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशास‍कीय अधिकारी सुर्यभान गमे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री आकाश किसवे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, संरक्षण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक मधुकर गंगावणे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख्‍य आणि कर्मचारी तसेच शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी संस्‍थानच्‍या संरक्षण विभाग, फायर अॅण्‍ड सेफ्ट, सुरक्षा एजन्‍सीज, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदिंनी आकर्षक परेड सादर केले. त्‍यानंतर संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शिर्डी शहरातील सर्व माध्‍यमिक शाळांमधील इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या १६ गुणवंत विद्यार्थ्‍यांना श्री.द.म.सुकथनकर मार्च २०१९ हे पारितोषिक व संस्‍थानच्‍या शैक्षणिक संकुलातील इयत्‍ता १२ वीच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या नऊ गुणवंत विद्यार्थ्‍यांना कै.लहानुबाई अमृतराव गोंदकर पारितोषिक वाटप करण्‍यात आले. तसेच संस्‍थानच्‍या श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेच्‍या राज्‍यात पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा व राज्‍य शासनाकडून विभागीयस्‍तरावर श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेने प्रथम क्रमांक पटकावुन १ लाख रुपयाचे बक्षीस प्राप्‍त केल्‍या बद्दल औ.प्र.संस्‍थेचे प्राचार्य शिवलिंग पटणे, गटनिदेशक प्रा.रामनाथ चौधरी व प्रा.दादा जांभुळकर यांचा श्री.मुगळीकर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

याप्रसंगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी मनोगत व्‍यक्‍त करुन स्‍वतंत्र दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर व विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍तीपर गीत सादर केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राजेंद्र कोहकडे, प्रा.वसंत वाणी, प्रा.विकास पाटील व प्रा.सुजय बाबर यांनी केले.

Undefined
News Image: 
News Date: 
Friday, August 16, 2019