श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे संस्थानचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Undefined
श्री गुरुपौर्णिमा उत्सवात लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन
Thursday, July 10, 2025 - 10:15