Languages

   Download App

News

News

दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव बातमी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार असून उत्‍सवाच्‍या

November 9th, 2020

शिर्डी –
              श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरा करण्‍यात येत आहे. कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार असून उत्‍सवाच्‍या रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात येणा-या लक्ष्‍मीपुजनाचे वेळी पूजेकरीता गांवकरी/साईभक्‍तांकडून पैसे अथवा ना‍णी पाकीटे स्विकारण्‍याकामी मंदिर परीसरात व्‍यवस्‍था  करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.
               श्री.बगाटे म्‍हणाले, यावर्षी जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे शनिवार दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी साजरा करण्‍यात येणारा दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे. तसेच या उत्‍सवाच्‍या रुढी परंपरेनुसार लक्ष्‍मीपुजनाचे वेळी पूजेकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून पैसे अथवा नाणी पाकीटे स्विकारली जातात. त्‍याअनुषंगाने गांवकरी व साईभक्‍तांकडून लक्ष्‍मीपुजनाचे वेळी पूजेकरीता पैसे अथवा नाणी पाकीटे स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४  येथील देणगी कार्यालय व मारुती मंदिराशेजारील साईकॉम्‍पलेक्‍स देणगी कार्यालय या ठिकाणी काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी गांवकरी व साईभक्‍तांनी दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी सकाळी १०.०० ते सायं.०४.३० यावेळेत लक्ष्‍मीपुजनाकरीता आपली पाकीटे सिलबंद करुन त्‍यावर स्‍वतःचे नाव, पुर्ण पत्‍ता व मोबाईल नंबर टाकुन सदर काऊंटर्सवर जमा करुन टोकन ताब्‍यात घ्‍यावे. ज्‍या साईभक्‍तांनी लक्ष्‍मीपुजनाकरीता आपली पाकीटे जमा केली आहेत अशाच साईभक्‍तांनी स्‍वतः आपली पाकीटे त्‍याच दिवशी दि.१४ नोव्‍हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०७.३० वाजता त्‍याच काऊंटरवर टोकन जमा करुन पाकीटे ताब्‍यात घ्‍यावी.  
                तसेच सर्व गांवकरी व साईभक्‍तांनी लक्ष्‍मीपुजनाकरीता पाकीटे देतांना आणि घेतांना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच संस्‍थानचे संरक्षण व पाकीटे स्विकारणारे कर्मचा-यांना सहकार्य करावे, असे आवाहान ही श्री.बगाटे यांनी केले.

 

Recent News