Languages

   Download App

News

News

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव सांगता

October 10th, 2019

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०१९ रोजी पासून सुरु असलेल्‍या श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.श्री.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांच्‍या काल्याच्या किर्तनाने झाली.

आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.जयश्रीताई मुगळीकर यांच्‍या हस्‍ते श्री गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा करण्‍यात आली. तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.वैशाली ठाकरे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्‍यात आली. तर सकाळी १०.०० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायं.०६.१५ वाजता धुपारती झाली

तसेच रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत श्रीमती अश्विनी जोशी, नाशिक यांचा भजन संध्‍या कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्टेजवर झाला. यासर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिली. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींची गुरुवारची नित्‍याची पालखी मिरवणूक निघाली. या पालखी मिरवणूकीत संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. त्‍यानंतर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती झाली.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Recent News