Languages

   Download App

News

News

साईभक्‍तांना मोफत निंबवृक्षाच्‍या रोपांचे वाटप

July 26th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वनमहोत्‍सवाच्‍या निमित्‍ताने संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते साईभक्‍तांना मोफत निंबवृक्षाच्‍या रोपांचे वाटप करण्‍यात आले.

याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, माजी उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, सौ.नलिनी हावरे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, पोलिस उपनिरिक्षक मधुकर गंगावणे, बगीचा विभाग प्रमुख अनिल भणगे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, शैक्षणिक संकुलातील अध्‍यापक-अध्‍यापिका, विद्यार्थी, साईभक्‍त व गांवकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.हावरे म्‍हणाले, श्री साईबाबांनी संपुर्ण मानव जातीला श्रध्‍दा आणि सबुरी चा मंत्र दिला आहे. श्रध्‍दा माणसाच्‍या जीवनाचा मोठा भाग आहे. तसेच सबुरी ही तितकीच महत्‍वाची आहे. या मंत्रा बरोबरच त्‍यांनी सेवेचे तंत्र ही दिले आहे. बाबा स्‍वतः भिक्षा मागुन जमवलेले धान्‍य शिजवून लोकांना जेवन देत असे. त्‍यांनी झाडू हातात घेवून स्‍वच्‍छता केली, झाडे लावली त्‍यांचे संवर्धन करुन लेंडीबाग फुलवली. श्री साईबाबांचा हा सेवेचा वसा आपण पुढे नेण्‍याचे काम करत आहोत.

राज्‍याचे वन मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्‍या वर्षी ०२ कोटी, दुस-यावर्षी १३ कोटी झाडे लावण्‍याचा संकल्‍प पुर्ण केला आहे. आता त्‍यांनी ३३ कोटी झाडे लाण्‍याचा संकल्‍प केला असून त्‍यांनी सर्वांना झाडे लावण्‍याचे आवाहन ही केलेले आहे. यात खारीचा वाटा म्‍हणुन श्री साईबाबा संस्‍थानने वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच आज साईभक्‍तांना मोफत वृक्ष वाटपाचे काम हाती घेण्‍यात आले असल्‍याचे सांगुन सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्‍यांनी वृक्ष लागवड करावी असे आवाहन ही डॉ.हावरे यांनी केले.

तसेच याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, माजी उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम आदीची भाषणे झाली. त्‍यानंतर उपस्थित साईभक्‍त, विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामस्‍थांना संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्ष वाटप करण्‍यात आले.

आभार उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी मानले. तर सुत्रसंचालन श्री.वसंत वाणी यांनी केले.

Recent News