केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन; जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
शिर्डी: केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडीक आणि माजी आमदार आशुतोष काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ना. सी. आर. पाटील यांनी साईचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.