Languages

   Download App

News

News

आज दि. २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्‍ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्‍वरुपात देणेत आलेली आहे. संस्‍थानच्‍या वतीने वाहनाची विधीवत पुजा करुन महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा कंपनीच्या वतीने रसयश जोशी (सीएफओ) यांनी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेकडे वाहनाची चावी सुपुर्द केली. त्‍यानंतर संस्‍थानचे वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी श्री जोशी यांचा श्री साईबाबांची मुर्ती व शाल देवून सत्‍कार केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले, विश्‍वनाथ बजाज व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.

Recent News