Languages

   Download App

News

News

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी कोपरगांव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्‍याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यां

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी कोपरगांव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्‍याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यां

December 1st, 2020

शिर्डी -

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी कोपरगांव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्‍याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी २२५० लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.

सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून राज्‍य शासनाच्‍या  आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने मंदिर व दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणेकामी अधिक प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करावा लागणार असल्‍यामुळे शिर्डी लगतच्‍या सॅनिटायझर उत्‍पादक साखर कारखान्‍यांना प्रत्‍येकी ०५ हजार लिटर सॅनिटाझर देणगी स्‍वरुपात संस्‍थानला देणेबाबत आवाहन करणेत आलेले होते.

त्‍यानुसार कोपरगांव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्‍याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी ०५ लिटर क्षमतेचे ४५० नग जार असे एकुण २२५० लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असून उर्वरित सॅनिटायझर संस्‍थानच्‍या आवश्‍यकतेनुसार टप्‍या-टप्‍याने देणगी स्‍वरुपात उपलब्‍ध करुन देणार आहेत. 

 

--

Recent News