Languages

   Download App

News

News

आज मंग‍ळवार, दिनांक २३ जुलै २०२४ रोजी श्रीलंका येथील २० साईभक्‍तांनी शि‍र्डी येथे श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी श्रीलंकन साईभक्‍तांनी सांगीतले की, श्रीलंकेतील  कोलंबो शहरात आमचे श्री  साईबाबांचे मंदिर आहे  या मंदिराची निर्मि‍ती १९६६ साली केली असुन या मंदिरात भारतातील जयपुर येथुन नेलेली ५ फुट उंचीची व ५ हजार किलो वजनाची श्री साईबाबांची मुर्ती स्‍थापन केलेली आहे. आम्‍ही सर्व या मंदिराचे कमिटी मेंबर असुन गेल्‍या १५ वर्षांपासुन शि‍र्डी येथे श्री साईबाबांचे दर्शनासाठी दरवर्षी  येत आहोत.

Recent News