Languages

   Download App

Archived Tenders 2020

Archived Tenders 2020

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०१९ पासून सुरु झालेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाची सांगता.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०१९ पासून सुरु झालेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाची सांगता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्‍या काल्‍याच्‍या कीर्तनाने उत्‍साही वातावरणात झाली.

April 15th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शुक्रवार, दिनांक १२ एप्रिल २०१९ पासून सुरु झालेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाची सांगता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्‍या काल्‍याच्‍या कीर्तनाने उत्‍साही वातावरणात झाली.  

          आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी संस्‍थानचे प्रकाशने विभाग अधिक्षक राजतिलक बागवे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.मंगला बागवे यांनी सहपरिवार समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता  रघुनाथ आहेर व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.वंदना आहेर यांच्‍या हस्‍ते रुद्राभिषेक करण्‍यात आला. दुपारी १२ वाजाता ह.भ.प.विक्रम महाराज नांदेडकर यांच्‍या काल्‍याच्‍या कीर्तनानंतर दहिहंडी कार्यक्रम होवून माध्‍यान्‍ह आरती झाली.

          उन्‍हाची तीव्रता लक्षात घेवून संस्‍थानच्‍या वतीने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था ठेवली होती. तसेच श्रीरामनवमी उत्‍सवाकरीता आलेल्‍या पालखीतील पदया‍त्रींची निवासाची व्‍यवस्‍था साईधर्मशाळा येथे नाममात्र दरात करण्‍यात आली होती. तसेच पदयात्रींना सुखकर व सुलभतेने बाबांच्‍यादर्शनाचा लाभ मिळावा म्‍हणून बायोमेट्रीक पासेसचे स्‍वतंत्र काऊंटर सुरु करण्‍यात आले होते. मुंबई-शिर्डी महार्गावर पालखीतील पदयात्रीकरीता ठिकठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या टॅकरची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. तर आवश्‍यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्‍यात आले होते.

श्रीरामनवमी उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पारपाडण्‍यासाठी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

Recent News