Languages

   Download App

News

News

शिर्डी-

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार, दिनांक १९ ऑक्‍टोबर ते बुधवार दिनांक २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होत असून, या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी केली आहे. 

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०८ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली आहे. संस्‍थानकडून १ लाख ६६ हजार ५८५ भक्‍तमंडळ सभासदांना श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आलेल्‍या असून १ लाख ९९ हजार देणगीदार साईभक्‍तांना E-mail द्वारे देखील आंमत्रित करण्‍यात आलेले आहे. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त गुजरात येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती ममता सतिष कपिलेश्‍वरकर यांच्‍या देणगीतून मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे तसेच मुंबई -शिर्डी येथील साई व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “साईद्वारकाधिश” हा भव्य व आकर्षक देखावा.” गेट क्र. ४ चे प्रवेशव्‍दाराशेजारी उभारण्‍यात येत आहे तसेच, या उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

श्री गाडीलकर म्‍हणाले, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्‍त आहेत. हे साईभक्‍त श्री पुण्‍यतिथी सोहळ्यानिमित्‍त आपल्‍या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्‍याकरीता शिर्डीला येतात. त्‍यामुळे श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्‍या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर व नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ६५ हजार चौरस फुटाचे मंडप तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी भक्‍त निवासस्‍थान येथे २९ हजार चौरस फुटाचा असा एकुण साधारणत: ९४ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आले आहे. संस्‍थानचे सर्व निवासस्‍थान येथे एकुण १७,७५९ साईभक्‍तांची निवास व्‍यवस्‍था होणार आहे. तसेच तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात साधारणतः ५,००० साईभक्‍तांची निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्‍सवाकरीता श्री साई प्रसादालयामध्‍ये उत्‍सवाचे पहिल्‍या (प्रारंभ) दिवशी गुलाब जामुन, दुसरे (मुख्‍य) दिवशी खीर, तिसरे (सांगता) दिवशी बालुशाही हे मिष्‍ठान्‍न म्‍हणून प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. तसेच साईभक्‍तांकरीता सुमारे १७० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद व मोफत बुंदी प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात येणार असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी वेगवगळया ०८ ठिकाणी नवीन दर्शनरांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, साईकॉम्‍पलेक्‍स, गेट नं.०४ जवळ आतील बाजु, व्‍दारकामाई समोरील खुले नाटयगृह, सेवाधाम, श्री साईप्रसादालय व सबका मालिक एक मार्केट आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र सुरु राहणार आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. उत्‍सव काळात भक्‍तांच्‍या सोयीसाठी साधारण ०८ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहे. गुरुस्‍थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईआश्रम, श्री साईप्रसादालय व मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच संस्‍थानच्‍या वतीने श्री साईबाबा मंदिर, मंदिर परिसर, सर्व निवासस्‍थाने, श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात येणार आहे.

श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी सोमवार, दिनांक १९ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायणास सुरुवात, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत सौ. अश्विनी सरदेशमुख यांचा ‘स्‍वरांजली संगीत सेवा’ कार्यक्रम, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्‍ण कालेकर, कोल्‍हापुर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री. मधुसुदन भुवड, बोरिवली यांचा ‘साईराम संगीत संध्‍या’ हा कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रीं चे पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती (पालखी मिरवणुक परत आल्‍यानंतर) होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील. 

उत्‍सवाचे पारायणात अध्‍याय वाचनासाठी भाग घेऊ इच्छिणारे साईभक्‍तांनी रविवार, दि. १८ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०५.१५ वाजेपर्यंत देणगी काऊंटर नंबर १ येथे आपली नावे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्‍या साईभक्‍तांची त्‍याच दिवशी संध्‍याकाळी ०५.२० वाजता समाधी मंदिरातील स्‍टेजवर चिठ्ठया काढुन ( ड्रॉ पध्‍दतीने ) अध्‍याय वाचनासाठी निवड केली जाईल व उर्वरीत चिठ्ठ्यांमधुन विणाधारकांची नावे निवडण्‍यात येतील. त्‍यानंतर भाग्‍यवान अध्‍याय वाचकांची व विणाधारकांची नांवे व्‍दारकामाईचे बाहेरील दर्शनीय भागात व समाधी मंदिराचे उत्‍तर बाजूचे फलकावर लावले जातील. 

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंगळवार, दिनांक २० ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०७.३० वाजता श्रींचे समाधी मंदिरावरील सुवर्ण कळसाला यावर्षी ७४ वर्ष पूर्ण होऊन ७५ अमृत महोत्‍सवी वर्ष सुरू होत असल्‍याने श्रींचे समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्‍यानंतर सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्‍ण कालेकर, कोल्‍हापुर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री गौतम अरोरा, दिल्‍ली यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्री रोहित दुग्‍गल, श्रीरामपुर यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. सायं.०७.३० ते १०.०० वा. संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री राम शंकर, मुंबई यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.३० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक २० ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व २१ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.

ज्‍या साईभक्‍तांना भिक्षाझोळी कार्यक्रमात भाग घ्‍यावयाचा असेल त्‍यांनी आपली नावे सोमवार दि. १९ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ०८ ते ११.३० या कालावधीत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्‍या साईभक्‍तांची त्‍याच दिवशी समाधी मंदिरातील स्‍टेजवर दुपारी १.०० चे दरम्‍यान ड्रॉ पध्‍दतीने चिठ्ठया काढण्‍यात येतील व भाग्‍यवान भिक्षा झोळीधारकांची नांवे जाहिर केली जातील. हि नावे समाधी मंदिराचे बाहेरील उत्‍तर बाजूचे फलकावर लावणेत येतील.

उत्‍सवाच्‍या तृतीय (सांगता) दिवशी बुधवार, दिनांक २१ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपुजा, व सकाळी ०७.०० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० ते १२.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्‍ण कालेकर, कोल्‍हापुर यांचा गोपालकाला किर्तन व दहिहंडी कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्‍या दरम्‍यान श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० सौ. पद्मावती पारेकर, निनाद ग्रृप, पुणे यांचा ‘भक्‍ती संगीत’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. पद्मश्री विजय घाटे यांचा ‘तालचक्र’ कार्यक्रम, तसेच सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती, सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री राजेश कृष्‍णा खर्डे (वेसावकर), मुंबई यांचा ‘परंपरा साईंची’ कार्यक्रम होईल. तर, रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. उत्‍सवकाळात कीर्तन कार्यक्रम आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे. 

तसेच उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंगळवार २० ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० ते ०५.३० यावेळेत होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे त्‍याच दिवशी अनाऊंसमेंट रुम येथे आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन उत्‍सवाच्‍या कालावधीत श्री साईसत्‍यव्रत पुजा (सत्‍यनारायण पुजा), अभिषेक पुजा व वाहन पुजा बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याचे ही श्री गाडीलकर यांनी सांगितले.

हा उत्‍सव यशस्‍वरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजी कचरे, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, भा.प्र.से. व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.English Translation

Shirdi—

On behalf of the Shri Saibaba Sansthan Trust (Shirdi), as per tradition, the Shri Saibaba Punyatithi Festival is being celebrated this year from Monday, 19 October to Wednesday, 21 October 2026. The Chief Executive Officer of the Sansthan, Goraksha Gadilkar (IAS), has appealed to all Sai devotees to participate in large numbers.

Preparations for the 108th Shri Punyatithi Festival organized by the Sansthan are complete. The Sansthan has sent invitation letters to 166,585 devotee group members and extended e-mail invitations to 199,000 donor devotees. CEO Goraksha Gadilkar shared that on this occasion, temple and premises floral decorations are being sponsored by donor devotee Smt. Mamata Satish Kapileshwarkar from Gujarat. Additionally, attractive electrical illumination and a grand “Sai Dwarkadhish” replica near Gate No. 4 are being set up by the Sai Dwarkamai Mandal of Mumbai-Shirdi, alongside various religious and cultural programs.

Mr. Gadilkar stated that millions of Sai devotees across the globe visit Shirdi during the Punyatithi celebration to seek their Sadguru’s blessings. Considering the anticipated rush for Samadhi Darshan, temporary waterproof pandals spanning approximately 94,000 sq. ft. have been erected—including 65,000 sq. ft. across the temple premises, in front of Chavadi, Maruti Temple to Shyamsundar Hall, the palanquin route south of the Samadhi Temple, Sai Garden, and the New Sai Prasadalaya area, along with 29,000 sq. ft. at the Bhakta Niwas for additional lodging. Regular Sansthan accommodation facilities can house 17,759 devotees, with temporary arrangements made for approximately 5,000 more.

During the festival, the Shri Sai Prasadalaya will serve special sweets in the meal offerings: Gulab Jamun on the first day (inaugural), Kheer on the second day (main day), and Balushahi on the third day (concluding day). Approximately 170 quintals of sugar are being used to prepare Motichoor Laddu Prasad and free Boondi Prasad packets. To ensure seamless distribution, 8 Laddu sales counters will operate at locations including the New Darshan Queue, Shri Sainath Mangal Karyalaya, Sai Complex, inside Gate No. 4, the Open Theatre in front of Dwarkamai, Sevadham, Shri Sai Prasadalaya, and the Sabka Malik Ek Market, with plans to add more if needed. Extra tea and coffee arrangements have been set up along the darshan queues across ground and first floors of Shanti Niwas, Sai Complex, Sai Ashram, Dharmashala, Bhakta Niwas (500 rooms), Dwarawati Bhakta Niwas, and Sai Garden. Eight first-aid centers have been established (including near Dixit Wada opposite Gurusthan, Darshan Queue, New Bhakta Niwas, Sai Ashram, Prasadalaya, and the Centenary Pandal near Maruti Temple), supported by standby ambulances and heightened security across all premises.

Schedule of Events:

 * Day 1: Monday, 19 October 2026

   * 05:15 AM: Kakad Aarti

   * 05:45 AM: Procession of Shri's portrait and holy book (Pothi)

   * 06:00 AM: Commencement of the Akhand Parayan of Shri Sai Satcharita at Dwarkamai

   * 06:20 AM: Mangal Snan (Holy Bath)

   * 07:00 AM: Paduka Puja

   * 12:30 PM: Madhyan Aarti

   * 01:00 PM – 03:00 PM: Swaranjali Sangeet Seva by Smt. Ashwini Sardeshmukh

   * 04:00 PM: Kirtan by H.B.P. Smt. Radhika Gopal-krishna Kalekar (Kolhapur)

   * 06:00 PM: Dhoop Aarti

   * 07:00 PM – 09:30 PM: Sairam Sangeet Sandhya by Shri Madhusudan Bhuvad (Borivali)

   * 09:15 PM: Palkhi Procession through the town

   * 10:00 PM: Shej Aarti (following the return of the Palkhi)

   * Dwarkamai will remain open all night for the Akhand Parayan.

   * (Devotees wishing to read chapters for the Akhand Parayan must register at Donation Counter No. 1 on Sunday, 18 October, between 01:00 PM and 05:15 PM. Lots will be drawn at 05:20 PM on the Samadhi Temple stage to select chapter readers and Veena bearers, with names displayed outside Dwarkamai and on the north notice board of the Samadhi Temple.)

 * Day 2 (Main Day): Tuesday, 20 October 2026

   * 05:15 AM: Kakad Aarti

   * 05:45 AM: Conclusion of Akhand Parayan; procession of Shri's portrait and holy book

   * 06:20 AM: Mangal Snan

   * 07:00 AM: Paduka Puja

   * 07:30 AM: Golden Kalash Amrit Mahotsav program (commemorating the completion of 74 years and entry into the 75th year of the Golden Spire over the Samadhi Temple)

   * 09:00 AM: Bhiksha Zoli program (Interested devotees must register on Monday, 19 October, between 08:00 AM and 11:30 AM at Donation Counter No. 1; selections will be made via a lucky draw at 01:00 PM on the temple stage and posted on the north notice board).

   * 10:00 AM: Kirtan by H.B.P. Smt. Radhika Gopal-krishna Kalekar

   * 10:30 AM: Aradhana ritual before the Samadhi

   * 12:30 PM: Madhyan Aarti

   * 01:00 PM – 03:00 PM: Sai Bhajan by Shri Gautam Arora (Delhi)

   * 03:30 PM – 05:30 PM: Sai Bhajan by Shri Rohit Duggal (Shrirampur)

   * 05:00 PM: Simollanghan ritual at Khandoba Temple

   * 06:00 PM: Dhoop Aarti

   * 07:30 PM – 10:00 PM: Sai Bhajan by music director and singer Shri Ram Shankar (Mumbai)

   * 09:15 PM: Rath (Chariot) Procession through the town

   * 10:00 PM – 05:30 AM: Artist presentation program (Kalakar Hajeri) before Shri

   * Because the Samadhi Temple remains open all night for Darshan, the Shej Aarti at 10:00 PM on 20 October and Kakad Aarti at 05:15 AM on 21 October will not take place.

 * Day 3 (Concluding Day): Wednesday, 21 October 2026

   * 05:50 AM: Mangal Snan

   * 06:50 AM: Paduka Puja

   * 07:00 AM: Rudrabhishek Puja at Gurusthan Temple

   * 10:00 AM – 12:00 PM: Gopalkala Kirtan and Dahi Handi by H.B.P. Smt. Radhika Gopal-krishna Kalekar

   * 12:10 PM: Madhyan Aarti

   * 01:00 PM – 03:00 PM: Devotional music by Smt. Padmavati Parekar (Ninad Group, Pune)

   * 03:30 PM – 05:30 PM: Taalchakra performance by Padma Shri Vijay Ghate

   * 06:00 PM: Dhoop Aarti

   * 07:00 PM – 09:30 PM: Parampara Saichi by Shri Rajesh Krishna Kharde (Vesavkar, Mumbai)

   * 10:00 PM: Shej Aarti

Artists intending to participate in the overnight Kalakar Hajeri on 20 October must register in advance on that day at the Announcement Room. Shri Sai Satyavrat (Satyanarayan) Puja, Abhishek Puja, and Vahan (vehicle) Puja will remain suspended throughout the festival period.

Under the guidance of Ad-hoc Committee Chairman and Principal District & Sessions Judge Shivaji Kachare, Committee Member and District Collector Dr. Pankaj Ashiya (IAS), and CEO Goraksha Gadilkar (IAS), Deputy CEO Bhimraj Darade, along with administrative officers, security officials, department heads, and Sansthan staff, are actively working to ensure the festival's success.

हिंदी अनुवाद (Hindi Translation)

शिर्डी—

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) की ओर से प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी सोमवार, १९ अक्टूबर से बुधवार, २१ अक्टूबर २०२६ के दौरान श्री साईबाबा पुण्यतिथि उत्सव मनाया जा रहा है। इस उत्सव में सभी साईं भक्त बड़ी संख्या में शामिल हों, ऐसा आह्वान संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) ने किया है।

संस्थान द्वारा आयोजित १०८वें श्री पुण्यतिथि उत्सव की तैयारियां पूर्ण हो चुकी हैं। संस्थान की ओर से १ लाख ६६ हजार ५८५ भक्तमंडल सदस्यों को निमंत्रण पत्र भेजे गए हैं तथा १ लाख ९९ हजार दानदाता साईं भक्तों को ई-मेल द्वारा आमंत्रित किया गया है। उत्सव के उपलक्ष्य में गुजरात की दानदाता साईं भक्त श्रीमती ममता सतीश कपिलेश्वरकर के सौजन्य से मंदिर व परिसर में आकर्षक पुष्प सज्जा की जाएगी। साथ ही मुंबई-शिर्डी के साईं द्वारकामाई मंडल द्वारा आकर्षक विद्युत रोशनी तथा गेट नंबर ४ के पास भव्य "साईं द्वारकाधीश" झांकी सजाई जा रही है। सीईओ गोरक्ष गाडीलकर ने बताया कि उत्सव के दौरान विभिन्न धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है।

श्री गाडीलकर ने बताया कि दुनियाभर से लाखों श्रद्धालु पुण्यतिथि पर समाधि दर्शन के लिए पहुंचते हैं। संभावित भीड़ को देखते हुए मंदिर परिसर, चावड़ी के सामने, मारुति मंदिर से श्यामसुंदर हॉल, समाधि मंदिर के दक्षिण का पालकी मार्ग, साईं उद्यान तथा नवीन साईं प्रसादालय परिसर आदि स्थानों पर ६५ हजार वर्ग फुट तथा भक्त निवास में २९ हजार वर्ग फुट, यानी कुल लगभग ९४ हजार वर्ग फुट का वाटरप्रूफ मंडप तैयार किया गया है। संस्थान के स्थायी निवास स्थानों में १७,७५९ भक्तों के ठहरने की व्यवस्था है, जबकि लगभग ५,००० भक्तों के लिए अस्थायी निवास व्यवस्था की गई है।

श्री साई प्रसादालय में उत्सव के प्रथम दिन गुलाब जामुन, मुख्य दिन खीर, तथा समापन के दिन बालूशाही मिष्ठान्न भोजन प्रसाद में दिया जाएगा। इसके अतिरिक्त १७० क्विंटल शक्कर से बूंदी व मोतीचूर के प्रसादी लड्डू तैयार किए जा रहे हैं। भक्तों की सुविधा के लिए नवीन दर्शन कतार, श्री साईंनाथ मंगल कार्यालय, साईं कॉम्प्लेक्स, गेट नं. ४ अंदर, द्वारकामाई के सामने खुला नाट्यगृह, सेवाधाम, नवीन प्रसादालय और सबका मालिक एक मार्केट सहित कुल ०८ स्थानों पर लड्डू बिक्री केंद्र शुरू रहेंगे। दर्शन कतार, शांति निवास (भूतल व प्रथम तल), साईं कॉम्प्लेक्स, साईं आश्रम, धर्मशाला, भक्त निवास (५०० रूम), द्वारावती और साईं उद्यान परिसर में चाय, कॉफी व दूध की विशेष व्यवस्था रहेगी। प्राथमिक चिकित्सा के लिए ८ केंद्र स्थापित किए गए हैं तथा आपातकालीन सेवा के लिए एम्बुलेंस और सुरक्षा व्यवस्था चाक-चौबंद रखी गई है।

उत्सव का दैनिक कार्यक्रम:

 * पहला दिन: सोमवार, १९ अक्टूबर २०२६

   * प्रातः ०५:१५ बजे: काकड़ आरती

   * प्रातः ०५:४५ बजे: श्री की प्रतिमा व पोथी की शोभायात्रा

   * प्रातः ०६:०० बजे: द्वारकामाई में 'श्री साईसच्चरित' अखंड पारायण प्रारंभ

   * प्रातः ०६:२० बजे: मंगल स्नान

   * प्रातः ०७:०० बजे: पाद्यपूजा

   * दोपहर १२:३० बजे: मध्याह्न आरती

   * दोपहर ०१:०० से ०३:०० बजे: श्रीमती अश्विनी सरदेशमुख द्वारा 'स्वरांजली संगीत सेवा'

   * दोपहर ०४:०० बजे: ह.भ.प. श्रीमती राधिका गोपालकृष्ण कालेकर (कोल्हापुर) का कीर्तन

   * सायं ०६:०० बजे: धूपारती

   * सायं ०७:०० से रात्रि ०९:३० बजे: श्री मधुसूदन भुवड (बोरिवली) द्वारा 'साईंराम संगीत संध्या'

   * रात्रि ०९:१५ बजे: नगर में श्री की पालकी शोभायात्रा

   * रात्रि १०:०० बजे: शेज आरती (पालकी वापसी के पश्चात)

   * अखंड पारायण के कारण द्वारकामाई पूरी रात खुली रहेगी।

   * (पारायण में अध्याय पठन के इच्छुक श्रद्धालु रविवार, १८ अक्टूबर को दोपहर १ से सायं ५:१५ बजे तक दान काउंटर नं. १ पर नाम दर्ज कराएं। शाम ५:२० बजे ड्रॉ निकालकर पाठकों व वीणा धारकों का चयन होगा।)

 * मुख्य दिन: मंगलवार, २० अक्टूबर २०२६

   * प्रातः ०५:१५ बजे: काकड़ आरती

   * प्रातः ०५:४५ बजे: अखंड पारायण समाप्ति, प्रतिमा व पोथी शोभायात्रा

   * प्रातः ०६:२० बजे: मंगल स्नान

   * प्रातः ०७:०० बजे: पाद्यपूजा

   * प्रातः ०७:३० बजे: समाधि मंदिर स्वर्ण कलशारोहण अमृत महोत्सव कार्यक्रम (स्वर्ण कलश के ७४ वर्ष पूर्ण होकर ७५वें वर्ष में प्रवेश के उपलक्ष्य में)

   * प्रातः ०९:०० बजे: भिक्षा झोली कार्यक्रम (इच्छुक श्रद्धालु १९ अक्टूबर को सुबह ८ से ११:३० बजे के बीच काउंटर नं. १ पर नाम दर्ज कराएं; दोपहर १ बजे समाधि मंदिर स्टेज पर ड्रॉ निकाला जाएगा)

   * प्रातः १०:०० बजे: ह.भ.प. श्रीमती राधिका कालेकर का कीर्तन

   * प्रातः १०:३० बजे: समाधि के समक्ष आराधना विधि

   * दोपहर १२:३० बजे: मध्याह्न आरती

   * दोपहर ०१:०० से ०३:०० बजे: श्री गौतम अरोरा (दिल्ली) द्वारा साईं भजन

   * दोपहर ०३:३० से ०५:३० बजे: श्री रोहित दुग्गल (श्रीरामपुर) द्वारा साईं भजन

   * सायं ०५:०० बजे: खंडोबा मंदिर में सीमोल्लंघन कार्यक्रम

   * सायं ०६:०० बजे: धूपारती

   * सायं ०७:३० से १०:०० बजे: संगीत निर्देशक व गायक श्री राम शंकर (मुंबई) द्वारा साईं भजन

   * रात्रि ०९:१५ बजे: नगर में श्री का रथोत्सव

   * रात्रि १०:०० से प्रातः ०५:३० बजे: श्री के समक्ष 'कलाकार हाजिरी' कार्यक्रम

   * मुख्य दिन मंदिर रातभर खुला रहने के कारण २० अक्टूबर की शेज आरती (रात्रि १०:००) और २१ अक्टूबर की काकड़ आरती (प्रातः ०५:१५) नहीं होगी।

 * तीसरा (समापन) दिन: बुधवार, २१ अक्टूबर २०२६

   * प्रातः ०५:५० बजे: मंगल स्नान

   * प्रातः ०६:५० बजे: पाद्यपूजा

   * प्रातः ०७:०० बजे: गुरुस्थान मंदिर में रुद्राभिषेक पूजा

   * प्रातः १०:०० से १२:०० बजे: ह.भ.प. श्रीमती राधिका कालेकर का गोपालकाला कीर्तन व दहीहांडी कार्यक्रम

   * दोपहर १२:१० बजे: मध्याह्न आरती

   * दोपहर ०१:०० से ०३:०० बजे: श्रीमती पद्मावती पारेकर (निनाद ग्रुप, पुणे) द्वारा भक्ति संगीत

   * दोपहर ०३:३० से ०५:३० बजे: पद्मश्री विजय घाटे का 'तालचक्र' कार्यक्रम

   * सायं ०६:०० बजे: धूपारती

   * सायं ०७:०० से रात्रि ०९:३० बजे: श्री राजेश कृष्णा खर्डे (वेसावकर, मुंबई) द्वारा 'परंपरा साईंची'

   * रात्रि १०:०० बजे: शेज आरती

२० अक्टूबर की रात कलाकार हाजिरी कार्यक्रम में भाग लेने के इच्छुक कलाकारों को उसी दिन अनाउंसमेंट रूम में अग्रिम पंजीकरण कराना होगा। उत्सव की अवधि में श्री साईं सत्यव्रत (सत्यनारायण) पूजा, अभिषेक पूजा एवं वाहन पूजा बंद रहेगी।

उत्सव के सफल आयोजन हेतु संस्थान तदर्थ समिति के अध्यक्ष व प्रधान जिला एवं सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे, तदर्थ समिति सदस्य व जिलाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), सीईओ गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे सहित सभी प्रशासनिक अधिकारी, सुरक्षा अधिकारी, विभागाध्यक्ष एवं कर्मचारी प्रयासरत हैं।

 

Recent News