Languages

   Download App

News

News

News

June 17th, 2019

शिर्डी –

दिनांक ३१ मे २०१९ रोजी श्री साईबाबा समाधी मंदिर परिसराच्‍या गुरुस्‍थान मंदिरजवळील दान पेटीजवळ सोडून दिलेल्‍या व सापडलेल्‍या सहा महिन्‍याच्‍या मुलीचे संगोपन व शिक्षणासाठी संस्‍थानच्‍या अधिकारी, कर्मचारी व कर्मचा-यांंची पतपेढी यांच्‍याकडून आर्थिक मदत म्‍हणून जमा झालेल्‍या ०१ लाख रुपयाचा धनादेश व ६२ हजार ८९१ रुपयाची रोख रक्‍कम संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते स्‍नेहालय, अहमदनगर या संस्‍थेचे अध्‍यक्ष संजय गुगळे यांच्‍याकडे सुपूर्त करण्‍यात आली.

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुना‍थ आहेर, लेखाधिकारी कैलास खराडे, स्‍नेहालय, अहमदनगरचे विश्‍वस्‍त जयकुमार मुनोत, स्‍नेहांकुर प्रतिनिधी बाळासाहेब वारुळे, स्‍नेहालय प्रतिनिधी छाया लाड व संस्‍थान कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मुगळीकर म्‍हणाले, गुरुवार दिनांक ३१ मे २०१९ रोजी गुरुस्‍थान मंदिराजवळ सहा महिन्‍याची मुलगी बेवारस स्थितीमध्‍ये आढळुन आली होती. सदर मुलीस संस्‍थानचे संरक्षण विभागामार्फत नियमानुसार कायदेशीर सोपस्‍कार पार पाडण्‍यात येवुन त्‍या मुलीस शिर्डी पोलीस स्‍टेशन यांच्‍याकडे सोपविण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍या मुलीस शिर्डी पोलीस स्‍टेशन यांनी अहमदनगर येथील सामाजिक संस्‍था स्‍नेहालयकडे सोपविण्‍यात आलेले आहे. त्‍या लहान मुलीचे पुढील संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक मदत म्‍हणून संस्‍थानच्‍या सर्व अधिकारी, कर्मचारी व श्री साई संस्‍थान एम्‍प्लॉईज क्रेडीट को.ऑप. सोसा. लि.शिर्डी यांना यथाशक्‍ती व ऐ‍च्छिक स्‍वरुपात आर्थिक मदत करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले होते. त्‍यानुसार ०१ लाख ६२ हजार ८९१ रुपये रक्‍कम जमा झाली. सदरची रक्‍कम ही सामाजिक संस्‍था स्‍नेहालय, अहमदनगर यांच्‍याकडे आज देण्‍यात आलेली आहे. तसेच सदरची रक्‍कम ही त्‍या मुलीच्‍या संगोपन व शिक्षणासाठीच वापरण्‍यात येणार असल्‍याचे ही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

Recent News