Download App

News

News

Silver Coin News

November 5th, 2018

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षाच्‍या निमित्‍ताने राज्‍य शासनाच्‍या मान्‍यतेने २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणी साईभक्‍तांना श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सवाचे स्‍मरण रहावे म्‍हणून ना नफा ना तोटा या तत्‍वावर विक्रीसाठी उपलब्‍ध करुन देणेकामी भारत सरकार टंकसाळ, मुंबई यांच्‍याकडून महाराष्‍ट्र शासनाच्‍या मान्‍यतेने खरेदी करण्‍यात आली असून डिमांड ड्राप्‍टव्‍दारे रक्‍कम अदा करण्‍यात आलेली आहे. यामध्‍ये कुठलाही घोटाळा झाला नसल्‍याचे संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, अॅड.मोहन जयकर, डॉ.राजेंद्र सिंह, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील व उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदी उपस्थित होते.

डॉ.हावरे म्‍हणाले, श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षानिमित्‍त श्री साईबाबा महोत्‍सवाचे स्‍मरण रहावे ही नाणी साईभक्‍तांना ना नफा ना तोटा या तत्‍वावर विक्रीसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. त्‍यातुन संस्‍थानचा झालेला खर्च वसुल होणार असून यात संस्‍थानचे कुठलेही आर्थिक नुकसान होणार नाही. सदरची चांदीची नाणी भारत सरकार टंकसाळ, मुंबई यांच्‍याकडून खरेदी करणेस शासनाने १७ ऑक्‍टोबर २०१८ रोजी प्रशासकीय मान्‍यता दिलेली आहे.

भारत सरकार टंकसाळ, मुंबई ही संस्‍था केंद्र शासनाची असून त्‍यांच्‍याकडील चांदीच्‍या शुध्‍दतेची खात्री आहे. सरकारी टंकसाळ मधून प्रत्‍येक नाण्‍याची शुध्‍दता तपासून दिली जाते. तथापी सदरची नाणी बाहेरील खाजगी संस्‍थेकडून खरेदी केल्‍यास प्रत्‍येक नाण्‍याची शुध्‍दता तपासणे शक्‍य नाही. तसेच शुध्‍दता तपासणीकामी प्रत्‍येक नाणी मागे अतिरिक्‍त खर्च लागला असता. त्‍यानुसार भारत सरकार टंकसाळ, मुंबई यांच्‍याकडून खरेदी करण्‍यात आलेल्‍या चांदीच्‍या २५ ग्रॅम वजनाच्‍या नाण्‍याच्‍या दराची विगतवारी पुढील प्रमाणे आहे. ०१.मुळ चांदीची किंमत १,०१३.६५ रुपये ०२. वर्कींग लॉस (घट) १९.३१ रुपये ०३.मेकींग चार्जेस (मजुरी) ७१२.०४ रुपये ०४.पॅकींग चार्जेस (कव्‍हर) ५.०० रुपये असे एकुण १७५०.०० रुपये यावर जी.एस.टी ३% प्रमाणे ५२.५० रुपये व वन टाईम डाय खर्च २३.१८ रुपये अशा प्रकारे एका २५ ग्रॅम नाण्‍याची एकुण किंमत १८२५.६८ रुपये अशी आहे.

वरील प्रमाणे १० हजार चांदीचे नाणे भारत सरकार टंकसाळ, मुंबई यांच्‍याकडून खरेदीचा पुरवठा आदेश देण्‍यात आला असून त्‍यापैकी १ हजार नाणी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे. त्‍याचे बिल २० लाख ३४ हजार १८० रुपये व डायचा खर्च २ लाख ३१ हजार ६८१ रुपये असा डिमांड ड्राप्‍टव्‍दारे अदा करण्‍यात आलेले आहे.

तरी वरिल वस्‍तुस्थिती असताना शंका घेण्‍यास कुणालाही वाव राहीलेला नाही. तथापी राजकीय हेतुने जनतेमध्‍ये संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न काही लोक करत आहेत. या संभ्रमास वरिल सत्‍यस्थिती जाणून कोणीही साईभक्‍तांनी बळीपडू नये. यामध्‍ये कुठलाही घोटाळा अथवा पैशांचा अपव्‍यय झालेला नाही, असेही डॉ.हावरे यांनी सांगितले.

Recent News