Languages

   Download App

News

News

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.प्रवरानगर यांनी ५ हजार लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणग

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.प्रवरानगर यांनी ५ हजार लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणग

November 27th, 2020

शिर्डी -

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले असून साईभक्‍तांच्‍या  सुरक्षितेसाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.प्रवरानगर यांनी ५ हजार लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.

सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते. राज्‍य शासनाच्‍या  आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या  दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन मंदिर खुले झाल्‍यामुळे साईभक्‍तांच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे व दर्शनरांगेत प्रवेश करताना पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था आदी उपाययोजना संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आलेल्‍या आहेत. अशावेळी अधिक प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करावा लागणार असल्‍यामुळे शिर्डी लगतच्‍या  सॅनिटायझर उत्‍पादक साखर कारखान्‍यांना प्रत्‍येकी ५ हजार लिटर सॅनिटाझर देणगी स्‍वरुपात संस्‍थानला देणेबाबत आवाहन करणेत आलेले होते.

                त्‍यानुसार पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.प्रवरानगर यांचे वतीने माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी १६७५ लिटर सॅनिटायझर संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असून उर्वरित सॅनिटायझर संस्‍थानच्‍या आवश्‍यकतेनुसार टप्‍या-टप्‍याने देणगी स्‍वरुपात उपलब्‍ध करुन देणार आहेत.    

 

Recent News