Languages

   Download App

News

News

श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणा-या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना प्रसाद साहित्‍या करीता प्‍लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये तसेच संस्‍थानच्‍या संरक्षण विभागातील कर्मचा-यांनी दर्शन रांगेतुन व इतर ठिकाणाहुन साईभक्‍तांकडुन मंदिरात प्‍लॅस्टिक साहि

श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणा-या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना प्रसाद साहित्‍या करीता प्‍लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये तसेच संस्‍थानच्‍या संरक्षण विभागातील कर्मचा-यांनी दर्शन रांगेतुन व इतर ठिकाणाहुन साईभक्‍तांकडुन मंदिरात प्‍लॅस्टिक साहि

June 22nd, 2019

शिर्डी

श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणा-या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना प्रसाद साहित्‍या करीता प्‍लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये तसेच संस्‍थानच्‍या संरक्षण विभागातील कर्मचा-यांनी दर्शन रांगेतुन व इतर ठिकाणाहुन साईभक्‍तांकडुन मंदिरात प्‍लॅस्टिक साहित्‍य व पिशवी जाणार नाही याची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या सभागृहात साई मंदिरात प्रसादाच्‍या प्‍लॅस्टिक पिशव्‍यांच्‍या  वापराबाबत कडक कारवाई बाबत आयोजीत केलेल्‍या बैठकीत श्री.मुगळीकर बोलत होते. संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, सुर्यभान गमे, अशोक औटी, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी मधुकर गंगावणे, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर व नगरपालिकेचे मुख्‍य लिपीक श्री.देसले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री.मुगळीकर म्‍हणाले, राज्‍य शासनाने प्‍लॅस्टिक बंदीचा निर्णय यापुर्वीच घेतलेला असून त्‍याची कार्यवाही संस्‍थानने सुरू केलेली आहे. तथापि तरीही काही भाविंकाकडे प्रसाद साहित्‍या करीता प्‍लॅस्टिक पिशव्‍यांचा वापर होत असल्‍याचे निदर्शनास आलेले आहे. संस्‍थानच्‍या संरक्षण विभागातील कर्मचा-यांनी दर्शन रांगेतुन व इतर ठिकाणाहुन साईभक्‍तांकडुन मंदिरात प्‍लॅस्टिक साहित्‍य व पिशवी जाणार नाही याची, दक्षता घ्‍यावी. तसेच याकरीता शिर्डी नगरपालिकेने प्‍लॅस्टिक विक्री करणा-या दुकानदारांवर शासन नियमानुसार योग्‍यती कार्यवाही करावी अशा सुचना श्री.मुगळीकर यांनी केलेल्‍या आहेत.

 

Recent News