Download App

News

News

संस्‍थान आस्‍थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे एक दिवसीय संमेलन आयोजन

October 29th, 2018

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०१ नोव्‍हेंबर २०१८ रोजी सायं. ५.३० ते रात्रौ ११.०० यावेळेत श्री साई आश्रम भक्‍तनिवास येथे संस्‍थान आस्‍थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल यांनी दिली.

श्रीमती रुबल अग्रवाल म्‍हणाल्‍या, श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पुर्ण झाले असून श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने श्री साईबाबा समाधीचा शताब्‍दी सोहळा दिनांक ०१ ऑक्‍टोबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. हा समाधी शताब्‍दी सोहळा भव्‍य स्‍वरुपात साजरा व्‍हावा याउद्देशाने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले होते. या शताब्‍दी वर्षाची सांगता श्री पुण्‍यतिथी उत्‍सवात दिनांक १९ ऑक्‍टोबर २०१८ रोजी मा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांचे शुभहस्‍ते मोठया उत्‍साहात पार पडला. या संपुर्ण शताब्‍दी वर्षात संस्‍थानच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या सर्व कार्यक्रमांच्‍या यशस्‍वीतेसाठी संस्‍थान आस्‍थापनेवरील सर्व वरिष्‍ठ–कनिष्‍ठ अधिकारी यांचेसह सर्व स्‍तरावरील कर्मचारी वर्गाने तन-मन-धनाने मेहनत घेवून केलेले कार्य कौतुकास्‍पद आहे.

संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व सर्व विश्‍वस्‍त यांनी श्री साईबाबा समाधी शताब्‍दी वर्षाचे यशस्‍वीतेसाठी राबणा-या संस्‍थान आस्‍थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन करुन आभार प्रदर्शित करणेकामी व शताब्‍दी महोत्‍सवानिमित्‍त लोकार्पण करण्‍यात आलेल्‍या चांदीचे नाण्‍यांचे वितरण करणेसाठी सर्व कर्मचा-यांचा सहभाग असणारे एक दिवसीय संमेलन आयोजित करणेचा निर्णय घेतला आहे. त्‍या अनुषंगाने श्री साई आश्रम भक्‍तनिवास येथील अॅम्‍पीथिएटर येथे दिनांक ०१ नोव्‍हेंबर २०१८ रोजी सायं. ५.३० ते रात्रौ ११.०० यावेळेत संस्‍थान आस्‍थापनेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्‍यात आले असल्‍याचे सांगुन संस्‍थानचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन ही श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.

Recent News