श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १५ मे २०२५ रोजी गोपी फिल्मस प्रा.लि. मुंबई यांनी श्री साईचरणी ४०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला चांदीचा हार अर्पण केला. यासह मेडीकल फंडासाठी रुपये ०१ लाख ११ हजार १११ देणगी दिली. हा सुंदर नक्षिकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.




