श्री साईबाबांची पुण्यतिथी – पुर्वपिठीका
श्री साईबाबांचा १०८ वा पुण्यतिथी (दसरा) उत्सव सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर ते बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ या काळात साजरा होणार आहे. या निमित्ताने पुण्यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका.
श्री साईबाबांनी १०७ वर्षांपुर्वी म्हणजेच सन १९१८ मध्ये विजयादशमीच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. या दिवशी मंगळवार होता. त्यानंतर सन १९१९ साली तिथीप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. विजयादशमी म्हणजे श्री साईबाबांची पुण्यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देश विदेशातील लाखो साईभक्त हा उत्सव साजरा करतात. याही वर्षी श्रीक्षेत्र शिर्डी येथे हा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करणेत येत असून त्यानिमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री साईसच्चरिताच्या ४२ व्या अध्यायात बाबांच्या महानिर्वाणाचे वर्णन करण्यात आले आहे. हेमाडपंत म्हणतात, बाबांचे एक भक्त रामचंद्र पाटील कोते एकदा अतिशय आजारी पडले. जीवावरचे संकट त्यांना सोसवत नव्हते. कोणताच उपाय बाकी राहीला नव्हता. जीव अगदी नकोसा होवून गेला. अशा अवस्थेत एका मध्यरात्री बाबा एकाएकी रामचंद्र पाटलांच्या उशापाशी प्रकटले. रामचंद्र पाटलांनी बाबांचे पाय धरले आणि निराश होवून म्हणाले ‘मला मरण नक्की कधी येईल तेवढे सांगा. या आयुष्याचा कंटाळा आला आहे.’ त्यावर मुर्तीमंत करुणा असलेले बाबा म्हणाले, रामचंद्रा...उगाच चिंतातूर का होतोस काळजी करु नकोस तुझं गंडान्तर टळलं आहे. पण तात्या पाटलाची मला धडगत दिसत नाही. शके अठराशें चाळीस (शके १८४०) च्या दस-याच्या दिवशी तात्या मोक्षपदाला पावेल. परंतु ही गोष्ट तात्या जवळ बोलु नकोस. तो मनात धास्ती घेवून बसेल.
दिवस भराभर उलटू लागले. तशी तात्या पाटलांच्या मरणाची वेळ जवळ येवू लागली. रामचंद्र पाटलांची धास्तीही वाढू लागली. कारण बाबांचे बोल म्हणजे वज्रलेप! ते त्यांनी तात्या पाटलांपासून गुप्त ठेवले. पण कोणाकडे तरी मन मोकळं केल्याशिवाय त्यांना चैन पडेना. शेवटी ही गोष्ट त्यांनी बाळा शिंप्याला सांगितली आणि हे कोणालाही सांगू नकोस असं बजावलं. सन एकोणीसशें अठरा (१९१८) चा भाद्रपद सरला अश्विन लागणार तोच तात्या पाटलांनी अंथरुण धरले. तर दुसरीकडं बाबांनाही थंडी वाजून आली. तात्यांचा भरवसा बाबांवर आणि बाबांचा रक्षणकर्ता श्रीहरी होता. दुखण्याने त्रासलेल्या तात्यांचे चित्त बाबांकडे लागले होते. भेटीची ओढ लागली होती. परंतु त्यांना चालवतही नव्हते. दिवसेंदिवस दुखणे वाढत होते. औषधांना दाद न देता अनावर होत होते. बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ येत होता....बाबांचे म्हणणे आता खरं होणार या विचाराने रामचंद्र पाटील आणि बाळा शिंप्याची धास्ती वाढू लागली. शुध्द पक्षाची दशमी आली. तात्यांची नाडी कमी वाहू लागली. आप्तेष्ट घाबरून गेले. परंतु तात्यांच्या बाबतीत कुठलीच वाईट घटना घडणार नव्हती. आलेल्या काळाला परत जावे लागणार होते. आणि तसच झालं. तात्यांचे गंडान्तर टळले. तात्या राहीले आणि बाबांनी देह त्याग केला.
देहावसन जवळ आले तरी लक्ष ठेवून चारा-पाचांचा मेळ घालून बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना आपली आठवण म्हणून नऊ नाणी दिली. जवळ असलेल्या मंडळीना जेवायला पाठवून दिले. मनाने अस्वस्थ होते तरी आज्ञा झाल्याने ते जाण्यासाठी उठले. आज्ञेचे उल्लंघन करवेना, सोबतही सोडवेना आणि बाबांचे मनही मोडवेना. शेवटी सर्वजण वाड्यात जेवायला गेले. पण मन बाबांजवळ गुंतलेले होते. सारे जेवायला बसले. तेवढ्यात बोलावणे आले. हातातला घास तसाच टाकून सर्वजण व्दारकामाईकडे धावले. परंतु वेळ निघून गेली होती. बयाजी पाटलांच्या मांडीवर बाबांनी आपला देह ठेवला होता.
दस-याचे बाबांना प्रेम का होते? तर साडेतीन मुहुर्तांपैकी दस-याचा हा मुहुर्त कोठेही जाण्यासाठी विशेष शुभ समजला जातो, हे सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे, परंतु हेही म्हणणे बरोबर नव्हे. ज्याला जाणे व येणेच नाही त्याला कोठून आले आहे निर्याण! मुहुर्ताचीही त्याला काय जरुरी ज्याला धर्माचे किंवा अधर्माचे बंधन नाही, ज्याची सर्व बंधने निवळली आहेत ज्याच्या प्राणाला निघून जाणे नाही त्याला निर्याण ते कसले! अशा साईमहाराजांना येणे किंवा जाणे नाही, मग निर्याण स्थिती तरी कोठली! आयुष्यमर्यादारुपी तेल संपल्यावर प्राणरुपी ज्योत मंद झाल्यावर बाबांचा देह बयाजी पाटलांच्या मांडीवर विसवला. नाही पडून किंवा निजून पण स्वस्थपणे गादीवर बसून, असा प्रकारे आपल्या हस्ते दानधर्म करुन बाबांनी आपला देह ठेवला. साईसमर्थांचे मनोगत कोणालाही न कळता त्यांनी हातोहात आपला देह ठेवला आणि ते ब्रह्मीभूत झाले. देहाचा व मायेचा बुरखा पांघरुन संत या जगात अवतार घेतात आणि मानवाचा उध्दार करण्याचे कार्य संपले म्हणजे लगेच अव्यक्तात समरस होऊन जातात. बाबांनी आपला देह आपल्या भक्तांकरीता आजन्म कष्टविला. त्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय तत्कालीन भक्तांनी घेतला. पुर्वपरंपरा पाहिली तर पुण्यतिथी साजरी करणे हे महत्पुण्य आहे. वर्षभर घरोघरी प्रत्येक जण आराधना करतच असतो. परंतू त्याची पुर्तता करण्याकरता व सदगुरुंचा आशिर्वाद घेण्याकरीता पुण्यतिथीच्या दिनी समाधीस्थानीच आले पाहिजे.
यहाँ आपके द्वारा दी गई साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवाशी संबंधित माहितीचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद दिला आहे:
श्री साईबाबा का १०८ वा पुण्यतिथि उत्सव: विजयादशमी और महानिर्वाण की पृष्ठभूमि श्री साईबाबा के १०८ वें पुण्यतिथि (दसरा) उत्सव के उपलक्ष्य में आपने बेहद सुंदर और भक्तिमय जानकारी साझा की है। श्री साईसच्चरित्र के ४२ वें अध्याय पर आधारित यह पृष्ठभूमि साईभक्तों को भावुक करने वाली और साई चरणों में लीन कर देने वाली है।
इस संपूर्ण जानकारी के अत्यंत महत्वपूर्ण और प्रमुख बिंदु निम्नलिखित हैं:
-
पुण्यतिथि उत्सव की अवधि (२०२६): सोमवार, दिनांक १९ अक्टूबर से बुधवार, दिनांक २१ अक्टूबर २०२६ तक शिर्डी में १०८ वां पुण्यतिथि उत्सव मनाया जा रहा है।
-
महानिर्वाण का ऐतिहासिक दिन: १०७ वर्ष पहले, वर्ष १९१८ में विजयादशमी के दिन (मंगलवार) दोपहर २ बजकर ३५ मिनट पर साईबाबा ने शिर्डी में अपना देह त्यागा था। वर्ष १९१९ से तिथि के अनुसार विजयादशमी के दिन बाबा की पहली पुण्यतिथि मनाई गई।
-
तात्या पाटील और रामचंद्र पाटील से जुड़ी आख्यायिका: बाबा ने रामचंद्र पाटील को पहले ही बता दिया था कि तात्या पाटील का गंडयांतर शक १८४० के दसरे के दिन है और तात्या मोक्षपद को प्राप्त होंगे। लेकिन, इसके विपरीत हुआ; तात्या का गंडयांतर टल गया और साईबाबा ने खुद अपने शिष्य और भक्तों के लिए अपना देहत्याग किया।
-
महानिर्वाण के अंतिम क्षण: लक्ष्मीबाई शिंदे को ९ स्वर्ण मुद्राएं देकर, उपस्थित लोगों को भोजन के लिए भेजकर और बयाजी पाटील की गोद में बैठकर अत्यंत शांति से बाबा ने ब्रह्मीभूत होने का मार्ग चुना।
-
पुण्यतिथि का महत्व: वर्षभर घर पर आराधना करने के बावजूद सद्गुरु का पूर्ण आशीर्वाद प्राप्त करने और आत्मिक अनुभूति के लिए विजयादशमी के दिन समाधी स्थल पर उपस्थिति दर्ज कराना साईभक्तों के लिए परम सौभाग्य माना जाता है।
Shri Saibaba's 108th Punyatithi Festival: Background of Vijayadashami and Mahanirvana In anticipation of Shri Saibaba's 108th Punyatithi (Dassera) festival, you have shared very beautiful and devotional information. Based on the 42nd chapter of Shri Satcharita, this background evokes deep devotion and brings tears of joy to Saibhaktas' eyes.
The most important and key highlights of this information are as follows:
-
Punyatithi Festival Duration (2026): The 108th Punyatithi festival is being celebrated in Shirdi from Monday, 19th October to Wednesday, 21st October 2026.
-
The Historic Day of Mahanirvana: 107 years ago in 1918, on the day of Vijayadashami (Tuesday) at 2:35 PM, Saibaba left his mortal body in Shirdi. Starting in 1919, the first Punyatithi was celebrated according to the lunar tithi on Vijayadashami.
-
The Legend of Tatya Patil and Ramchandra Patil: Baba had previously told Ramchandra Patil that Tatya Patil's fatal crisis (gandantar) would occur on Dassera of Shaka 1840 and that Tatya would attain liberation. However, the exact opposite happened; Tatya's crisis was averted, and Saibaba willingly relinquished His physical body for His devotee and disciple.
-
Final Moments of Mahanirvana: After giving nine coins to Laxmibai Shinde, sending the people around Him away for meals, and sitting calmly in Bayaji Patil's lap, Baba peacefully attained union with the ultimate reality (Brahmibhuta).
-
Significance of Punyatithi: Even with year-round worship at home, visiting the Samadhi shrine on Vijayadashami to receive the complete blessings of the Sadguru and experience divine grace is considered the ultimate fortune for every devotee.




