Languages

   Download App

News

News

श्री साईबाबांवरील अतुट विश्‍वास व श्रद्धेपोटी श्रद्धा मोटर्स, कोपरगांव यांनी श्री साईबाबा संस्‍थानला यापुर्वी ०३ दुचाकी मोटारसायकल देणगी स्‍वरुपात दिलेल्‍या आहेत. त्‍याच प्रमाणे आजही दि. ०३ सप्‍टेंबर  २०२५ रोजी श्रद्धा मोटर्स, कोपरगांव यांनी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता एक HONDA SHINE 100 DX दुचाकी मोटारसायकल देणगी स्‍वरुपात दिली आहे.  या वाहनाची संस्‍थानच्‍या वतीने विधीवत पुजा करण्‍यात आली. यावेळी देणगीदार साईभक्‍तांनी सदर वाहनाची चावी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांचेकडे सुपुर्द केली. त्‍यानंतर देणगीदार साईभक्‍तांचा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांनी सत्‍कार केला. यावेळी श्रद्धा मोटर्सचे एरिया इनचार्ज स्‍वप्‍नील जवारकर, झोनल मॅनेजर जेसल फर्नांडीस व महम्‍मद अन्‍वर हुसेन व डिलर विशाल सरोदे तसेच संस्‍थानचे प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.

Recent News