Languages

   Download App

News

News

साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली

साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली

December 30th, 2020

शिर्डी -

चंदीगढ येथील तृतियपंथी समाजाच्‍या साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकार्यांनी श्री साईबाबा संस्‍थानला रोख स्‍वरुपात ११ लाख रुपये देणगी दिली. याप्रसंगी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी त्‍यांचा सत्‍कार करुन आभार मानले.

यावेळी साईभक्‍त सोनाक्षी व त्‍यांच्‍या १० सहकारी म्‍हणाल्‍या की, आम्‍ही सर्व चंदीगढ येथून अनेक ठिकाणी भेट देत-देत शिर्डी येथे आलेलो आहोत. श्री साईबाबांचे दर्शन घेऊन आम्‍हाला सर्वांना आत्‍मीक शांती मिळाली. आम्‍हाला या ठिकाणी चांगली शिस्‍त बघायला मिळाली. श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने कोव्‍हीड-१९ च्‍या पार्श्‍वभूमीवर अतिशय चांगल्‍याप्रकारे उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत. सर्व साईभक्‍त मास्‍कचा वापर व सामाजिक अंतराच्‍या नियमांचे पालन करताने दिसत आहेत. दर्शन व्‍यवस्‍थेबाबत कुणाची कुठलीही तक्रार नाही.

संस्‍थानच्‍या वतीने कोव्‍हीड-१९ च्‍या पार्श्‍वभुमीवर केलेली व्‍यवस्‍था ही साईभक्‍तांच्‍या  आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने हिताची असुन सर्वांनी नियमांचे पालन करुन श्री साईबाबांच्‍या दर्शनाचा लाभ घ्‍यावा, असे सांगुन लवकरच कोरोनाचे सावट संपावावे अशी प्रार्थना ही सोनाक्षी व त्‍यांच्‍या सहकार्यांनी साईचरणी केली.

सरदचे साईभक्‍तांनी देणगी दिलेली असल्‍याने संस्‍थानकडून दर्शन आरतीचा मोफत पास उपलब्‍ध असूनही त्‍यांनी त्‍यास नम्रपणे नकार देऊन विहीत मार्गानेच दर्शनरांगेतून दर्शन घेणे पसंत केले. काही महिला भक्‍तांकडून दर्शन आरती व दर्शनासाठी देणगीची मागणी केली जाते या तथाकथीत बातमीच्‍या पार्श्‍वभूमीवर सदरची बाब निश्चितच स्‍पृहणीय आहे. संस्‍थानच्‍या वतीने या सर्वांना हार्दिक धन्‍यवाद देण्‍यात आले.

Recent News