Languages

   Download App

News

News

मलेशिया, लंडन व मॉरिशस येथून आलेल्‍या ४९ साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

December 4th, 2019

शिर्डी –

शिरडी साईबाबा सोसायटी ऑफ मलेशिया व वर्ल्‍ड शिरडी साईबाबा संस्‍था लंडन या संस्‍थेव्‍दारे मलेशिया, लंडन व मॉरिशस येथून आलेल्‍या ४९ साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले असून संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्‍यांचे स्‍वागत करुन सत्‍कार केला.

याप्रसंगी शिरडी साईबाबा सोसायटी ऑफ मलेशियाचे चेअरमन श्री.एस.पी.कन्‍नन, सौ.उषा कन्‍नन, वर्ल्‍ड शिरडी साईबाबा संस्‍था लंडनचे विनायक प्रियस्‍वामी, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव आदी मान्‍यवर उपस्थित होते.

श्री.कन्‍नन हे सन १९८७ पासून शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येत आहे. संपुर्ण मलेशियात १०० हुन अधिक साईबाबांची प्रार्थना स्‍थळे असून याठिकाणी श्री साईबाबांचा फोटो समोर ठेवून साईभक्‍त विविध पूजा, भजने व आरत्‍या गातात. मलेशियामध्‍ये विविध ठिकाणी २२ साईमंदिरे उभारलेली आहेत. यामध्‍ये कुआलालंपूर, जोहर बहरु, पेनांग येथील साईमंदिर हे सर्वात मोठे मंदिर असून याठिकाणी शिर्डी साईमंदिराप्रमाणे ४ ही आरत्‍या केल्‍या जातात. तसेच प्रसाद भोजन ही दिले जाते. मलेशिया सरकारने बोटॅनिक क्‍लॅंग येथे अर्धा एकर जागा श्री साईबाबा मंदिराकरीता देवू केलेली आहे. तसेच‍ मलेशियातील ईपोह येथील डोंगरावर १० एकर जागेवर श्री साईंची भव्‍य मुर्ती उभारणार असल्‍याचेही श्री.कन्‍नन यांनी सांगितले.

श्री साईबाबा समाधी मंदिरात शिरडी साईबाबा सोसायटी ऑफ मलेशिया व वर्ल्‍ड शिरडी साईबाबा संस्‍था लंडन यांनी साई सरस्‍वती संगित विद्यालय, शिर्डी यांच्‍या सहकार्याने भजनसंध्‍या कार्यक्रम केला. या कार्यक्रमात श्री.एस.पी.कन्‍नन, सौ.उषा कन्‍नन, विनायक प्रियस्‍वामी, श्रीमती राजश्री पिंगळे यांच्‍यासह मलेशिया, लंडन, मॉरिशस येथील साईभक्‍तांचा समावेश होता.

Recent News