Languages

   Download App

Sai Leela - 1979

Sai Leela - 1979

श्री साईसच्‍चरित पारायण सोहळ्याचे आयोजन बातमी

July 13th, 2019

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्‍ट ते शनिवार दिनांक १० ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत आयोजित करण्‍यात आलेल्‍या २५ वा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा साईनगर मैदानावरील मंडपात होणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हा साईनगर मैदानावर आयोजित करावा अशी मागणी नाट्य रसिक संच, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांनी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍याकडे केली होती. त्‍यानुसार अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी संबंधीतांशी चर्चा करुन त्‍याअनुषंगाने श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा नियोजनासाठी संस्‍थानचे विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांच्‍या उपस्थितीत बैठक आयोजित करण्‍याची सुचना केली होती. याबैठकीस नाट्य रसिक संच, शिर्डीचे पदाधिकारी व शिर्डी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रावणमासात दिनांक ०२ ऑगस्‍ट ते दिनांक १० ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत आयोजित करण्‍यात येणा-या श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा साईनगर मैदानावर करण्‍याचा निर्णय या बैठकीत घेण्‍यात आला. यावर्षी अंदाजे ८ ते १० हजार पारायणार्थी सहभागी होणार असल्‍याची शक्यता लक्षात घेवून यासाठी साईनगर मैदानावर सुमारे १० हजार व्‍यक्‍तींची बैठक व्‍यवस्‍था होईल अशा सुपरस्‍ट्रक्‍चर पत्रा मंडप उभारण्‍यात येणार आहे. याठिकाणी भव्‍य स्‍टेज, स्‍वागत कमानी उभारण्‍यात येणार असून पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृह, विद्युत पुरवठा, ध्‍वनीक्षेपण व्‍यवस्‍था व सुरक्षा व्‍यवस्‍था आदी सुविधा उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे. तसेच पारायणार्थींना दररोज चहा व अल्‍पोपहाराची व्‍यवस्‍था संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात येणार आहे.

हा पारायण सोहळा दररोज दोन सत्रात आयोजित करण्‍यात येणार असून पहिल्‍या सत्रात पुरुष व दुस-या सत्रात महिला पारायण वाचनार्थींचा सहभाग असणार असल्‍याचे सांगुन जास्‍तीत-जास्‍त साईभक्‍तांनी या पारायण सोहळ्यात सहभागी व्‍हावे असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले.

Recent News