Languages

   Download App

Sai Leela - 1979

Sai Leela - 1979

Gurupornima Festival 1st day News & Photo

July 15th, 2019

शिर्डी :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.

आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.०० श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी विणा, विश्वस्त बिपीनदादा कोल्‍हे यांनी पोथी तर विश्वस्त अॅड.मोहन जयकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, सौ.नलिनी हावरे, सौ.सरस्‍वती वाकचौरे, सौ.स्मिता जयकर, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ सौ.नलिनी हावरे यांनी प्रथम अध्याय, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्दितीय अध्याय, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते यांनी तृतीय अध्याय, विश्वस्त अॅड.मोहन जयकर यांनी चौथा अध्याय व साईभक्‍त श्रीमती अंजलीताई दाभोळकर यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.

उत्सवाचे निमित्ताने संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. तसेच राज्‍याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील व जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी श्रींच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती झाली. सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांचे कीर्तन झाले. रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्रीमती अश्विनी जोशी, नासिक यांचा भजन संध्‍या कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्न झाला. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच श्री साईसच्चरित पारायाणासाठी व्दारकामाई मंदीर रात्रभर उघडे ठेवण्‍यात आले.

यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती जयश्री शंकर यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट व मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्‍तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे पुणे येथून आलेल्‍या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्‍या पदयात्री भाविकांनी उत्‍सवात हजेरी लावली.

उद्या उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक १६ जुलै रोजी चंद्रग्रहण असल्‍यामुळे श्रींच्‍या शेजारतीनंतर समाधी मंदिर बंद राहील. उद्या पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती होणार आहे. ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.गंगाधरबुवा व्‍यास, डोंबवली (मुंबई) यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत पं.राजा काळे, पुणे यांचा अभंग कार्यक्रम, रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. तसेच रात्रौ १२.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

Recent News