Languages

   Download App

News

News

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. आपल्या बाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साईभक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात. अशाच एका श्रद्धावान साईभक्ताने, बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरात "ॐ साई राम" अशी दोन नावे अर्पण करण्याची मनोमन इच्छा अखेर पूर्ण केली.

आज या भक्ताने तब्बल १६०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची व किंमत रु. १ कोटी ५८ लाख ५० हजार ९८९ इतकी मौल्यवान असलेली दोन सुवर्ण "ॐ साई राम" अक्षरे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली. भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

ही सुवर्ण अक्षरे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्त करण्यात आली. त्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली असून ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या अनमोल दानाबद्दल संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साईभक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

सुवर्णाक्षरातील "ॐ साई राम" हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा, भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेले हे अक्षर भक्तांच्या हृदयाला भावणारे ठरत आहे.

Recent News