भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू पृथ्वी शॉ यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.