Languages

   Download App

गुढीपाडवा उत्‍सव २०२४

गुढीपाडवा उत्‍सव २०२४

आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना गाडीलकर यांचे हस्ते गुढीची विधीवत पुजा करुन श्री साईबाबा मंदीराचे कळसावर गुढी उभारण्यात आली. यावेळी श्री साईबाबा संस्थनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे , प्रशासकिय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
Undefined
गुढीपाडवा उत्‍सव २०२४
Tuesday, April 9, 2024 - 10:45